निशिकांतदादा युथ फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांना अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:27 IST2021-07-28T04:27:42+5:302021-07-28T04:27:42+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना महापुराच्या पाण्याचा फटका बसला असून, अनेक कुटुंबे महापुराचा धोका ओळखून ठिकठिकाणी स्थलांतरित ...

निशिकांतदादा युथ फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांना अन्नदान
इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना महापुराच्या पाण्याचा फटका बसला असून, अनेक कुटुंबे महापुराचा धोका ओळखून ठिकठिकाणी स्थलांतरित झाली आहेत. निशिकांतदादा युथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. प्रकाश शिक्षण, आरोग्य व उद्योग समूहाकडून पूरग्रस्तांना दररोज ५०० आहाराची किट देण्यात येत आहेत.
इस्लामपूर शहरासह विविध ठिकाणी पूरग्रस्त नागरिक स्थलांतरित झाले आहेत, तर काही नागरिकांनी परिसरातील शाळा, हाॅलमध्ये आश्रय घेतला आहे. निशिकांतदादा युथ फाउंडेशनच्या वतीने स्वच्छता, औषध फवारणी, चहा, नाष्टा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रकाश शिक्षण समूहाच्या मार्गदर्शिका सुनीता भोसले-पाटील यांनी पूरग्रस्तांच्या आहाराची जबाबदारी घेतली असून, दररोज ५०० जेवणाची किट विविध ठिकाणी पोहोच केली जात आहेत.
या उपक्रमासाठी फाउंडेशनचे संस्थापक अक्षय पाटील, प्रवीण माने, बाबासाहेब सांद्रे, सौरभ पाटील, चेतन पवार, भरत भाजणे, अनिल भोसले, बंडू कागवाडे, अमोल कुदळे, नेमा कुदळे, चेतन पवार, बंडू आडमुठे, अक्षय लवटे, शुभम गवळी, बाळासो पाटील, विपिन कुलकर्णी, प्रकाश आडमुठे, सोमनाथ गावडे, तुषार गवळी, रवी चव्हाण, रुतिक जगदाळे, किरण सावंत हे सेवाकार्य करीत आहेत.
फोटो-
वाळवा आणि मिरज तालुक्यातील
पूरग्रस्तांसाठी सुनीता भोसले-पाटील यांनी सहकारी महिलांच्या मदतीने जेवणाची पॅकेट बनविली.