क्रांती समूहातर्फे पूरग्रस्तांची भोजन व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST2021-07-27T04:27:57+5:302021-07-27T04:27:57+5:30
भिलवडी : पलूस तालुक्यातील कृष्णा नदीकाठच्या पूरग्रस्तांना क्रांती उद्योगसमूहातर्फे भोजनाचे वितरण करण्यात आले. आमदार अरुण लाड व शरद लाड ...

क्रांती समूहातर्फे पूरग्रस्तांची भोजन व्यवस्था
भिलवडी : पलूस तालुक्यातील कृष्णा नदीकाठच्या पूरग्रस्तांना क्रांती उद्योगसमूहातर्फे भोजनाचे वितरण करण्यात आले. आमदार अरुण लाड व शरद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
पूरग्रस्त भागातून स्थलांतर केलेल्या नागरिकांच्या पोटाची अबाळ होऊ नये म्हणून पहिल्या दिवसापासून जेवणाचे डबे पोहोच करण्यात आले. क्रांती समूहाने मदतकार्य सुरू केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भिलवडी, माळवाडी, बुरुंगवाडी, आमणापूर, बुर्ली, दुधोंडी, दह्यारी, घोगाव, तुपारी आदी गावांतील पुनर्वसन केंद्रात वितरण केले. महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा नंदा पाटील, युवती जिल्हाध्यक्षा पूजा लाड, वैष्णवी जंगम, प्राजक्ता जाधव, स्मिता यादव यांच्यासह कार्यकर्त्यांनी भोजन व्यवस्था केली. माळवाडी येथे पलूस तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष मोहन पाटील, क्रांती कारखान्याचे संचालक महावीर चौगुले, प्राजक्ता जाधव, वैष्णवी जंगम, स्मिता यादव यांच्या हस्ते भिलवडी गावातील पूरग्रस्तांना भोजनाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले.
फोटो : २६ भिलवडी २
माळवाडी (ता. पलूस) येथे मोहन पाटील, महावीर चौगुले, प्राजक्ता जाधव, वैष्णवी जंगम, स्मिता यादव यांनी भाेजन वाटप केले.
260721\img-20210726-wa0338.jpg
फोटो: माळवाडी(ता. पलूस) येथे जेवणाचे डबे देताना मोहन पाटील,महावीर चौगुले,प्राजक्ता जाधव,वैष्णवी जंगम,स्मिता यादव आदी