यशस्वी लोकांचा आदर्श बाळगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:15+5:302021-02-05T07:31:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कर्तृत्ववान व्यावसायिकांचा आदर्श लोकांपुढे आल्यास अनेकांना प्रोत्साहन मिळेल, असे मत सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट ...

यशस्वी लोकांचा आदर्श बाळगावा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कर्तृत्ववान व्यावसायिकांचा आदर्श लोकांपुढे आल्यास अनेकांना प्रोत्साहन मिळेल, असे मत सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब सांगली सिटीच्या व्यवसाय सेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून कलशेट्टी बोलत होते. रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर नितीन शहा अध्यक्षस्थानी होते. कलशेट्टी म्हणाले, अनेक व्यावसायिक आपल्या कर्तृत्वाने मोठे होतात. मात्र, त्याची माहिती समाजापर्यंत जात नाही. रोटरीने असे लपलेले हिरे शोधून त्यांचा सन्मान केला आहे, ही बाब कौतुकास्पद आहे.
स्वागत व प्रास्ताविक स्नेहल गौडाजे यांनी केले. सांगलीतील राजेंद्र चव्हाण, दिनेश कुडचे, विद्या माळी, अनिल चव्हाण व रेणुका देसाई या यशस्वी व्यावसायिकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संगणकतज्ज्ञ दिनेश कुडचे यांनी कोरोनाकाळातील तंत्रज्ञानाच्या वापराबाबत माहिती दिली. विद्या माळी यांनी निसर्गानुकूल वास्तुरचना याबाबत माहिती देऊन रोटरीने केलेल्या सत्काराबद्दल ऋण व्यक्त केले. नितीन शहा यांनी रोटरीच्या पोलिओ निर्मूलन योजनेसह संपूर्ण साक्षरता मोहिमेची माहिती दिली. यावेळी शशिकांत चौगुले, प्रशांत माने, पार्थ माळी, सुमेर जाजू, अविनाश पोळ, मानतुंग गौंडाजे यांचा विविध उपक्रमांबद्दल सत्कार झाला.
इव्हेंट चेअरमन मारुती गायकवाड यांनी जॉब फेअरविषयीची माहिती दिली. प्रेमराज जाजू यांनी आभार मानले. प्रशांत माने व प्रशांत आगवेकर यांनी सूत्रसंचालन केले. रणजित माळी, शिवचरण आगवेकर आदी सदस्यांनी संयोजन केले. यावेळी के.एस. भंडारे, आर्किटेक्ट प्रवीण माळी उपस्थित होते.