शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीवर धुक्याची चादर, सलग दोन दिवस अनुभव : हवामानातील लहरीपणा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 12:53 IST

सांगली शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानातील लहरीपणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. सांगली शहर व परिसरात गेली दोन दिवस पहाटे ते सकाळी ८ वाजेपर्यंत धुक्यांची चादर पसरली जात आहे. निसर्गाची वेगवेगळी रुपे एकाच दिवसात दिसू लागली आहेत.

ठळक मुद्देसांगलीवर धुक्याची चादर, सलग दोन दिवस अनुभव हवामानातील लहरीपणा सुरूच

सांगली : शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानातील लहरीपणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. सांगली शहर व परिसरात गेली दोन दिवस पहाटे ते सकाळी ८ वाजेपर्यंत धुक्यांची चादर पसरली जात आहे. निसर्गाची वेगवेगळी रुपे एकाच दिवसात दिसू लागली आहेत.सांगली शहरात मंगळवारप्रमाणे बुधवारीही पहाटे सहा वाजल्यापासून आठवाजेपर्यंत धुक्यांची चादर पसरली होती. दाट धुक्यांमुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह, शाळकरी मुले, व्यावसायिक यांना धुक्यांमधून वाट शोधत जावे लागले.

दाट धुके असल्यामुळे पहाटे तुरळक वाहतूक असूनही वाहनांना सावकाश जावे लागत होते. आठ वाजल्यानंतर सूर्यदर्शन झाले. मंगळवारीही अशीच परिस्थिती होती. सकाळ दाट धुके आणि दुपारी कडक ऊन असा अनुभव नागरिकांनी घेतला.

मंगळवारी दुपारी शहरासह जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३२ अंशापर्यंत गेले होते. गेल्या आठवड्यात उकाडा आणि थंडी असे दोन्ही अनुभव एकाच दिवसात येत होते. आता धुके आणि कडक उन्हाचा खेळ सुरू झाला आहे.भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार आगामी चार दिवस तापमानात मोठे चढ-उतार अनुभवास येतील. १६ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर तर किमान तापमान २१ अंशापर्यंत जाणार आहे.

१७ व १८ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या काही भागात पावसाची चिन्हे आहेत. हवामानाचा हा लहरीपणा आता आणखी काही दिवस नागरिकांना सोसावा लागणार आहे.

टॅग्स :environmentवातावरणSangliसांगलीTemperatureतापमान