शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कृष्णा, वारणेचा पूर ओसरला, सांगली जिल्ह्यातील २६ मार्ग खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 18:55 IST

वारणेतून पुन्हा विसर्ग घटवला : कोयनेतून विसर्ग वाढविल्याने कृष्णेची पाणीपातळी वाढणार

सांगली : जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने मंगळवारी दहा हजाराने विसर्ग वाढवून ४२ हजार १०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून पुन्हा विसर्ग कमी करून धरणातून आठ हजार ९२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तब्बल पाच दिवसांपासून पाण्याखाली गेलेले २६ मार्ग वाहतुकीसाठी खुले झाले. दरम्यान, कृष्णा नदीची पाणीपातळी बुधवारी एक फुटाने वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे.कोयना धरण क्षेत्रात चोवीस तासांत १०७ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणात ८५.४५ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारपासून धरणातून दहा हजाराने क्युसेक विसर्ग वाढविला आहे. धरणातून ४२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरण क्षेत्रात ७१ मि.मी. पाऊस झाला आहे. पाऊस कमी असल्यामुळे धरणातील विसर्ग कमी केला आहे. सध्या धरणातून आठ हजार ९२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दिवसभरात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत एक ते दीड फुटाने कमी झाली. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी सायंकाळी ३८.०६ फुटांवर आली होती.पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील पाच हजार नागरिकांचे स्थलांतर केले आहे. जिल्ह्यातील २४ पूल आणि १२ बंधारे पाण्याखाली कायम आहेत. जिल्ह्यातील ५६ रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यापैकी २६ रस्त्यांवरील पाणी कमी झाल्याने वाहतुकीसाठी मंगळवारी सुरू केले आहेत. अद्यापही २५ रस्त्यांवर पाणी असल्याने त्यासाठी पर्यायी मार्गावरून सुरू असलेली वाहतूक कायम आहे.

कृष्णेची दोन फुटाने पाणीपातळी वाढणार सध्या नदीची पाणीपातळी ही जरी कमी होत असली तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे. पाण्याची आवक वाढल्यामुळे कोयना व सातारा जिल्ह्यातील इतर धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बुधवारी कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी अंदाजे १ ते २ फूट वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिक आणि शेतकरी यांनी सतर्क राहावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.

धरणातून असा आहे विसर्गधरण - विसर्ग (क्युसेक)कोयना - ४२१००धोम - ४५३कन्हेर - ४६२२उरमोडी - ५००तारळी - ३५२६वारणा - ८०९२

अलमट्टीतून साडेतीन लाखाने विसर्ग होणारअलमट्टी धरणातील पाणीसाठा ६७.८५ टीएमसी झाला असून, तीन लाख दोन हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणातून तीन लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे. मात्र, आवक वाढत असल्याने कोणत्याही क्षणी तीन लाख ५० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविला जाणार आहे, अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर