शिगाव येथे पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:28 IST2021-07-30T04:28:00+5:302021-07-30T04:28:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिगाव : शिगाव येथील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा या संकल्पनेतून दिवंगत आमदार पी. टी. मधाळे परिवार ...

Flood relief at Shigaon | शिगाव येथे पूरग्रस्तांना मदत

शिगाव येथे पूरग्रस्तांना मदत

लोकमत न्यूज नेटवर्क

शिगाव : शिगाव येथील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा या संकल्पनेतून दिवंगत आमदार पी. टी. मधाळे परिवार व प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

काही दिवसांपूर्वीच पोलीस अधिकारी अजित मधाळे व बाळासाहेब मधाळे यांच्याकडून कोरोना विलगीकरण कक्षासाठी ३० हजार रुपये मदत करण्यात आली होती. पूरग्रस्त लोकांना डॉ. प्रतापराव मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. बाबासाहेब मधाळे, बाळासाहेब मधाळे, अजित मधाळे यांच्या सहकार्यातून मधाळेनगर व साठेनगरमधील दीडशे कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. ज्ञानप्रबोधिनी पश्चिम महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवर्तक युवा नेते संग्रामसिंह मधाळे, विठ्ठल पाटील, शहाजी कांबळे, पोलीस पाटील नरेंद्र मधाळे, तुषार मकवाना, उदय मधाळे, शुभम मधाळे, आकाश मधाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Flood relief at Shigaon