सांगलीत उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST2021-08-14T04:31:49+5:302021-08-14T04:31:49+5:30
सांगली : भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनी उद्या (रविवारी) सकाळी ९.०५ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयंत पाटील ...

सांगलीत उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
सांगली : भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनी उद्या (रविवारी) सकाळी ९.०५ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणावर होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
मुख्य शासकीय ध्वजारोहण रविवारी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी होणार असल्याने इतर शासकीय, खासगी संस्थांनी सकाळी ८.३५ ते ९.३५ या कालावधीत ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करु नयेत. एखाद्या कार्यालयाला ध्वजारोहण करावयाचे असल्यास ते ८.३५पूर्वी अथवा ९.३५ नंतर करावे.
या समारंभाला खासदार, आमदार, स्वातंत्र्यसैनिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, शहीद जवानांचे कुटुंबीय, कोरोना योद्धे तसेच नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी केले आहे.