कोरोना लसीचे पाच हजार डोस आले, आज लसीकरण सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:39+5:302021-05-31T04:20:39+5:30
सांगली : कोरोना लसीचे पाच हजार डोस रविवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले; त्यामुळे आज, सोमवारीदेखील लसीकरण सुरूच राहणार आहे. ...

कोरोना लसीचे पाच हजार डोस आले, आज लसीकरण सुरू राहणार
सांगली : कोरोना लसीचे पाच हजार डोस रविवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले; त्यामुळे आज, सोमवारीदेखील लसीकरण सुरूच राहणार आहे. ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना पहिल्या डोससाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्याशिवाय हेल्थ वर्कर्स व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनाही प्राधान्य मिळेल. रविवारी कोविशिल्डचे ३००० व कोव्हॅक्सिनचे २००० डोस मिळाले; त्यामुळे कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी थांबलेल्यांचेही लसीकरण होणार आहे. महापालिका क्षेत्रात व ग्रामीण भागात प्रत्यक्ष केंद्रावर नोंदणीनुसार व उपलब्धतेनुसार लस मिळणार आहे.
दरम्यान, रविवारी दिवसभरात २,३२१ जणांचे लसीकरण झाले. महापालिका क्षेत्रात एकालाही लस मिळाली नाही. ग्रामीण भागात २,२०६, तर निमशहरी भागात ११५ जणांचे लसीकरण झाले. आजवरच्या एकूण लसीकरणाने सात लाखांचा टप्पा पार केला. एकूण सात लाख ९६ इतके लसीकरण झाले.