मार्केट यार्डातील पाच दुकानांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:24 IST2021-05-22T04:24:55+5:302021-05-22T04:24:55+5:30
ओळी : सांगलीच्या मार्केट यार्डात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार दुकानांवर महापालिका आणि पोलिसांच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. लोकमत ...

मार्केट यार्डातील पाच दुकानांना दंड
ओळी : सांगलीच्या मार्केट यार्डात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार दुकानांवर महापालिका आणि पोलिसांच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वसंतदादा मार्केट यार्डात कोविड नियमांचे उल्लंघन करून सकाळी अकरानंतरही दुकाने सुरू ठेवल्याबद्दल पाच धान्य दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. महापालिका व पोलीस पथकाने या दुकानदारांकडून प्रत्येकी दहा हजारांचा दंड वसूल केला.
लाॅकडाऊनच्या काळात जिल्हा प्रशासनाने मार्केट यार्ड व गणपती पेठेतील होलसेल धान्य व किराणा व्यापाऱ्यांना सकाळी सात ते अकरा या वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. या सवलतीचा व्यापाऱ्यांनी गैरफायदा घेतला आहे. मार्केट यार्ड व गणपती पेठेत कोविड नियमांना हरताळ फासून दुकाने सुरू आहेत. मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना ठेंगा दाखविला आहे. त्यात आता अकरानंतरही काही दुकाने सुरू असल्याच्या तक्रारी महापालिका व पोलीस पथकांकडे आल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी मार्केट यार्डातील दुकानदारांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त एस. एस. खरात, लिपिक प्रमोद कांबळे, पोलीस हवालदार सतीश वगरे, अकबर हवालदार, आनंद आंबी आणि नासिर जांभळीकर यांच्या पथकाने शुक्रवारी अकरानंतर मार्केट यार्डाची तपासणी केली. यावेळी पाच धान्यांची दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आले. या पाचही दुकानदारांना प्रत्येकी दहा हजार असा ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.