फसवणूकप्रकरणी अखेर पाचजणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:23 IST2021-02-05T07:23:21+5:302021-02-05T07:23:21+5:30

सांगली : मौल्यवान खडा परदेशातून तपासणी करून आणण्यासाठी सांगलीतील व्यावसायिकास सव्वा पाच लाखांना गंडा घालणाऱ्या संशयितांवर अखेर गुन्हा ...

Five people have finally been charged in the fraud case | फसवणूकप्रकरणी अखेर पाचजणांवर गुन्हा दाखल

फसवणूकप्रकरणी अखेर पाचजणांवर गुन्हा दाखल

सांगली : मौल्यवान खडा परदेशातून तपासणी करून आणण्यासाठी सांगलीतील व्यावसायिकास सव्वा पाच लाखांना गंडा घालणाऱ्या संशयितांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक पाटील (वय ४५), दिलावर मन्सुर पटेल (४४, दोघेही रा. नांदणी, शिरोळ), अरुण साखरे (५५, इचलकरंजी), तात्यासाहेब आप्पासाहेब आडके (४२, रा. जयसिंगपूर) आणि एका अनोळखीवर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, व्यावसायिक असलेले फिर्यादी संदीप महादेव बोरगावे शारदानगर परिसरात राहण्यास आहेत. संशयितांनी बोरगावे यांचा विश्‍वास संपादन करून ओळख निर्माण करीत त्यांना सुलेमान पथ्थर नावाचा मौल्यवान खडा तपासणी करून आणण्यासाठी पाच लाख २५ हजार रुपये घेतले होते. पैसे परत मागूनही संशयितांनी ते देण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर बाेरगावे यांनी विश्रामबाग पोलिसांत फसवणुकीची फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Web Title: Five people have finally been charged in the fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.