महेंद्र लाडसह पाचजणांना अटक

By Admin | Updated: June 23, 2014 00:50 IST2014-06-23T00:39:53+5:302014-06-23T00:50:22+5:30

संदीप राजोबा मारहाणप्रकरण : संशयितांची जामिनावर मुक्तता

Five people arrested with Mahendra Lad | महेंद्र लाडसह पाचजणांना अटक

महेंद्र लाडसह पाचजणांना अटक


पलूस : पलूस पंचायत समितीच्या आमसभेमध्ये शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा यांना झालेल्या मारहाणप्रकरणी पलूस पोलिसांनी आज, रविवारी महेंद्र लाड (कुंडल), हेमंत पाटील (बुर्ली), विक्रम पाटील (पलूस), विजय आरबुने (दुधोंडी), मोहन तावदर (माळवाडी) यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. नंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.
याबाबत पलूस पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात सरकारतर्फे शनिवारी रात्री उशिरा फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पलूस पंचायत समितीच्या शनिवारी झालेल्या आमसभेत संदीप राजोबा हे उसाच्या एफ. आर. पी. संदर्भात गेल्या आमसभेत घेतलेल्या ठरावाबाबत विचारणा करीत होते.
त्यावेळी महेंद्र सुबराव लाड व हेमंत बालाजी पाटील यांनी राजोबा यांना व्यासपीठावरून ढकलले. व्यासपीठाखाली असलेल्या विक्रम पाटील, विजय आरबुने, मोहन तावदर या पाचजणांसह इतरांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली, असे फिर्यादीत म्हटले. (वार्ताहर)
पतंगरावांचे जावई
ाहेंद्र लाड हे पालकमंत्री पतंगराव कदम यांचे जावई आहेत. गुन्हे दाखल झालेले अन्य लोकही पतंगरावांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे या कारवाईबाबत दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.
कडेगाव आमसभेत तणाव
पलूसमध्ये शनिवारी राजोबा यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर रविवारी कडेगाव येथील आमसभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कडक पोलीस बंदोबस्तात ही आमसभा पार पडली. शनिवारच्या घटनेमुळे या आमसभेत थोडासा तणाव जाणवत होता. सभेत राजोबा यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला.

Web Title: Five people arrested with Mahendra Lad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.