कडेगाव नगरपंचायतीस लवकरच पाच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:33+5:302021-07-14T04:31:33+5:30
येथे नगरपंचायतीच्या वतीने शहरात २७ हायमास्ट एलईडी दिव्यांचा लोकार्पण सोहळा व तीन वॉटर एटीएमचे भूमिपूजन राज्यमंत्री कदम यांच्या ...

कडेगाव नगरपंचायतीस लवकरच पाच कोटी
येथे नगरपंचायतीच्या वतीने शहरात २७ हायमास्ट एलईडी दिव्यांचा लोकार्पण सोहळा व तीन वॉटर एटीएमचे भूमिपूजन राज्यमंत्री कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, सुरेश निर्मळ, सोनहिरा कारखान्याचे संचालक दीपक भोसले, विजय शिंदे, नगराध्यक्षा संगीता राऊत, उपनगराध्यक्ष दिनकर जाधव, मुख्याधिकारी कपिल जगताप उपस्थित होते.
कदम म्हणाले, कोरोनामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम विकास कामावर होणार नाही, याची दक्षता सरकार घेत आहे. कडेगाव नगरपंचायतीने काेरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळवले आहे. तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गाफील न राहता काळजी घ्यावी. लसीचा राज्यात तुटवडा असला तरी जसजशी लस उपलब्ध होईल तसतशी नागरिकांनी घ्यावी. नगरपंचायत प्रशासनाने आलेल्या निधीतून दर्जेदार विकासकामे करावीत. पैशांचा योग्य वापर करावा.
यावेळी नगरसेवक साजिद पाटील, सागर सूर्यवंशी, सुनील पवार, श्रीरंग माळी, नगरसेविका नीता देसाई, रिजवान मुल्ला, संगीता जाधव, राजेंद्र राऊत, हाजी फिरोज बागवान, शशिकांत रासकर उपस्थित होते.