म्हैसाळमध्ये चार विद्यार्थ्यांसह पाच जण कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:14+5:302021-03-24T04:24:14+5:30
१८ मार्च रोजी येथील एका विद्यालयातील एक शिक्षक कोरोना पाॅझिटिव्ह आले होते. त्यानंतर गावातील शालेय सल्लागार समितीची शालेय प्रशासनाने ...

म्हैसाळमध्ये चार विद्यार्थ्यांसह पाच जण कोरोना पॉझिटिव्ह
१८ मार्च रोजी येथील एका विद्यालयातील एक शिक्षक कोरोना पाॅझिटिव्ह आले होते. त्यानंतर गावातील शालेय सल्लागार समितीची शालेय प्रशासनाने बैठक घेऊन शाळा १४ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षकांच्या संपर्कात आलेल्या या विद्यालयातील पहिल्या टप्प्यात ९८, तर दुसऱ्या टप्प्यात ६१ जणांचे स्वाॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ९८ जणांपैकी तीन विध्यार्थी तर एक महिला शिपाई पॉझिटिव्ह आले होते. त्याच्या संपर्कात आलेले तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तपासणीसाठी ६१ जणाचे स्वॅब पाठविले होते. त्यापैकी पाच जण पाझिटिव्ह आल्याने विद्यार्थी व पालकांची तपासणी केली आहे.
कोट
दुसऱ्या टप्प्यात तपासणीसाठी ६१ जणांचे स्वॅब पाठविले होते. त्यापैकी पाच जण पाझिटिव्ह आले आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करणार आहोत.
-डॉ. नंदकुमार खंदारे, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र, म्हैसाळ.