शरद पाटील यांच्याकडून टाकळी विलगीकरण कक्षास पाच बेड भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:21 IST2021-06-02T04:21:05+5:302021-06-02T04:21:05+5:30
टाकळी : टाकळी (ता. मिरज ) येेेेथील विलगीकरण कक्षास माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी भेट दिली. रुग्णांची ...

शरद पाटील यांच्याकडून टाकळी विलगीकरण कक्षास पाच बेड भेट
टाकळी : टाकळी (ता. मिरज ) येेेेथील विलगीकरण कक्षास माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी भेट दिली. रुग्णांची विचारपूस करून त्यांनी पाच बेड भेट दिले.
टाकळी, बोलवाड हायस्कूल येथे आपत्ती व्यवस्थापन समितीतर्फे विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. टाकळी विलगीकरण कक्षात सध्या नऊ रुग्ण आहेत. त्यांना लोकवर्गणीतून आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. ग्रामस्थांकडूनही त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याची पाहणी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी केली. त्यांनी रुग्णांची विचारपूस करून विलगीकरण कक्षासाठी पाच बेड भेट दिले. आणखी काही मदत लागल्यास सर्वतोपरी तयार असल्याचे आश्वासन त्यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीस दिले.
यावेळी सरपंच महेश मोहिते, माजी उपसरपंच महावीर पाटील, शाळा समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील, मुख्याध्यापक पी. पी. पाचोरे, सुलेमान मुजावर, सचिन पाटील, अमोल पाटील, चंद्रकांत इटनाळ, संजय ऐनापुरे, एम. ए. पाटील उपस्थित होते.