येलूर ग्रामपंचायतीतर्फे पाच बेडचे कोविंड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:24 IST2021-05-22T04:24:42+5:302021-05-22T04:24:42+5:30

येलूर : येलूर (ता. वाळवा) येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने गावातच पाच बेडचे कोविड ...

Five Bed Kovind Center by Yelur Gram Panchayat | येलूर ग्रामपंचायतीतर्फे पाच बेडचे कोविंड सेंटर

येलूर ग्रामपंचायतीतर्फे पाच बेडचे कोविंड सेंटर

येलूर : येलूर (ता. वाळवा) येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने गावातच पाच बेडचे कोविड सेंटर सुरी केले आहे.

इस्लामपूर, सांगली या ठिकाणी शासकीय व खासगी दवाखान्यात कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळत नाहीत म्हणून येलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांसाठी वाळवा पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक व जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलानी यांच्या प्रयत्नातून आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीत पाच बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोविड सेंटर सुरू आहे, अशी माहिती तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजन महाडिक यांनी दिली.

यावेळी उपसरपंच बाळासाहेब जाधव, भगवानराव जाधव, विनायक महाडिक, सरदार गायकवाड, विजय पाटील, रंजित आडके, वैद्यकीय अधिकारी डी. एस. पाटील, माधुरी चव्हाण, अभिजित जाधव, बाबासो पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Five Bed Kovind Center by Yelur Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.