इस्लामपुरात तोडफोड प्रकरणातील पाचजणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST2021-09-02T04:57:16+5:302021-09-02T04:57:16+5:30
इस्लामपूर : येथील ओंकार कॉलनी परिसरातील घर व जागेच्या हद्दीच्या कारणातून ३० ते ४० जणांच्या जमावाने मानसोपचार तज्ज्ञांच्या क्लिनिकची ...

इस्लामपुरात तोडफोड प्रकरणातील पाचजणांना अटक
इस्लामपूर : येथील ओंकार कॉलनी परिसरातील घर व जागेच्या हद्दीच्या कारणातून ३० ते ४० जणांच्या जमावाने मानसोपचार तज्ज्ञांच्या क्लिनिकची रविवारी (दि. २९) तोडफोड केली होती. या हल्ल्यातील पाचजणांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या हल्ल्याची शहरात मोठी चर्चा होती. या तोडफोडीत क्लिनिकचे अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
ऋषिकेश भारत पाटील (वय २८, पेठ रस्ता), सौरभ संपत पाटील (१९), अविनाश शशिकांत देसाई (२८, ओंकार कॉलनी), अजय मच्छिंद्र कांबळे (२३), विशाल शामराव नाईक (१९, दोघे मोरे कॉलनी) अशी अटक केलेल्या पाचजणांची नावे आहेत. या हल्ल्याबाबत मानसोपचार तज्ज्ञ कालिदास अप्पासाहेब पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
कालिदास पाटील यांची ओंकार कॉलनीत घर, जागा आहे. या जागेच्या हद्द आणि भिंत बांधण्याच्या कारणातून रविवारी दुपारी माणिक मोरे, जयदीप मोरे यांच्यासह अन्य ३० ते ४० जणांच्या जमावाने पाटील यांच्या क्लिनिकमध्ये येऊन काठ्या, हॉकी स्टिक आणि कोयत्याने तेथील साहित्य आणि सीसीटीव्ही कॅमेरे, दुचाकी, झाडांची रोपे तोडत पाटील यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली.