फिट है तो हिट है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST2021-05-22T04:25:57+5:302021-05-22T04:25:57+5:30

फोटो २१ शीतल ०१, ०२, ०३ शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : एकीकडे कोरोनाशी दोन हात करतानाच महापालिका ...

Fit then hit | फिट है तो हिट है

फिट है तो हिट है

फोटो २१ शीतल ०१, ०२, ०३

शीतल पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : एकीकडे कोरोनाशी दोन हात करतानाच महापालिका क्षेत्रातील संभाव्य पूरस्थिती, विकासकामे, नालेसफाईसह विविध आघाड्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना लढावे लागत आहे. कामाचा ताण हलका करण्यासोबत आरोग्याची काळजी ते घेत आहेत. त्यासाठी योगा, वाॅकिंग, मेडिटेशन यावर ते भर देत आहेत. पुरेशी झोप आणि सकस आहाराचा फाॅर्म्युलाच हिट असल्याचे ते सांगतात.

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पदभार घेतल्यापासून वेगवेगळ्या संकटाशी संघर्ष करत आहे. आधी महापूराचा मुकाबला केल्यानंतर सहा महिन्यात कोरोनाने डोकेवर काढले. गेली वर्षभर ते फिल्डवर उतरून काम करत आहेत. थेट कोविड रुग्णालयात जावून ते संवाद साधत आहेत. दिवसभर कोरोना रोखण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेण्यासोबत रुग्ण, नातेवाईकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते कार्यरत आहेत. दुसरीकडे पावसाळापूर्व कामेही त्यांनी हाती घेतली आहेत. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ते दररोज सकाळी घरी व्यायाम करतात. शारीरिक उत्साह वाढविण्यासाठी योगाही करतात. कामाचा ताण हलका व्हावा, यासाठी निसर्गाइतका चांगला पर्याय नाही. त्यांच्या बंगल्यात विविध फळ, फुले झाडे आहेत तसेच मियावाकी जंगलही तयार केले आहे. त्यातून ते फेरफटका मारतात.

मिरजेच्या उपायुक्त स्मृती पाटील याही वर्षभरापासून ऑनफिल्ड आहेत. त्यांच्याकडे महापालिकेच्या कोविड सेंटरचा पदभार आहे शिवाय शहरातील समस्यांवर ते लक्ष ठेवून असतात. कोविड सेंटरमध्ये रात्री अपरात्री ते धावून जातात. पाटील या सकाळ व संध्याकाळ मेडिटेशन करतात. सकाळी योगा, प्राणायमावर भर देतात. फळे, भाजीपाला असा सकस आहार त्या घेतात. ताण हलका करण्यासाठी शास्त्रीय संगीत व जुनी गाणी ऐकतात. सांगलीचे उपायुक्त राहुल रोकडे यांच्यावरही मोठी जबाबदारी आहे. भाजीपाला घरपोचपासून ते कंटेनमेंट झोन, नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी ते सतत फिल्डवर असतात. पाॅझिटिव्ह रुग्णांशी त्यांचा थेट संपर्क येतो. स्वत:च्या आरोग्यासाठी ते योगा, हलका व्यायाम करतात. प्रतिकार शक्तीवाढीसाठी काढा व सकस आहारावर ते भर देतात.

Web Title: Fit then hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.