इस्लामपूर बाजार समितीत पहिल्यांदाच बोरगावची उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T22:45:37+5:302015-07-25T01:13:29+5:30
विरोधी महाआघाडीचाही उमेदवार नसल्याने उलट—सुलट चर्चा सुरू आहे.

इस्लामपूर बाजार समितीत पहिल्यांदाच बोरगावची उपेक्षा
नितीन पाटील -बोरगाव--इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने प्रथमच बोरगाव (ता. वाळवा) गटातून उमेदवार दिलेला नाही. अपेक्षित उमेदवार बदलत्या राजकीय समीकरणाने उपेक्षित राहिल्याचे दिसत आहे. येथून विरोधी महाआघाडीचाही उमेदवार नसल्याने उलट—सुलट चर्चा सुरू आहे.
बोरगावमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रबळ दोन गट कार्यरत आहेत. आजपर्यंत बाजार समितीच्या निवडणुका बिनविरोध होत होत्या. यावेळी राष्ट्रवादीविरोधात महाआघाडी स्थापन करून काँग्रेससह सर्व पक्षांनी मोट बांधली असली तरी, बोरगाव गटातून मात्र ना काँग्रेसचा उमेदवार, ना राष्ट्रवादीचा उमेदवार दिसत आहे. तालुक्याच्या राजकारणात या गावाचे मोठे योगदान आहे. त्यामानाने पदेदेखील दिली आहेत. बाजार समितीच्या स्थापनेपासून बोरगावला स्थान कायम असायचे. अध्यक्षपदही बोरगावच्या वाट्याला आले होते. यावेळी मात्र संचालक पदाची स्वपे्न पाहणाऱ्या इच्छुकांचे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रवादी अथवा काँग्रेसकडून का उमेदवारी दिली गेली नाही, याचे गूढ मात्र कायम आहे. काँग्रेसचे नेते, माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.
सध्या काँग्रेसला सक्षम नेतृत्व नाही. रोज एकाबरोबर चूल मांडली जाते, हे योग्य नाही. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीबाबत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे.
- प्रतापराव मोरे,
काँग्रेस नेते, रेठरेहरणाक्ष.
काँग्रेसचे पदाधिकारी प्रतापराव मोरे, किरण चव्हाण, निवास पाटील (शिगाव) व अन्य कार्यकर्त्यांशी चर्चा करून बाजार समिती निवडणुकीबाबत योग्यवेळी निर्णय घेणार आहे.
- जितेंद्र पाटील,
संचालक, कृष्णा कारखाना.
आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बाजार समिती निवडणुकीसंदर्भातील सर्व निर्णय झाले आहेत. ज्या गावाला यापूर्वी संधी मिळाली नाही, अशा गोटखिंडी, पेठ, ऐतवडे, कणेगाव, आष्टा, येडेमच्ंिंछंद्र या गावांना संधी देऊन राजकीय भाकरी परतण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळेच यावेळी बोरगावला संधी मिळालेली नाही.
- संजय पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष.