आईला नमस्कार करणे, हा पहिला संस्कारच!
By Admin | Updated: October 27, 2014 23:47 IST2014-10-27T23:04:15+5:302014-10-27T23:47:00+5:30
संपतराव गायकवाड : तुंग येथे व्याख्यान

आईला नमस्कार करणे, हा पहिला संस्कारच!
पुणो : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद रायसोनी आणि ठेवीदार यांच्या झालेल्या बैठकीत आज गोंधळ उडाला. सर्व पैसे देण्याची मागणी करीत ठेवीदारांनी गोंधळ केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. महिला ठेवीदारांनी रडत, तर इतर काही ठेवीदारांनी शिवीगाळ करीत पैसे परत करण्यासाठी ठिय्या मारला. प्रमोद रायसोनी यांनी ठेवीदारांना माहिती देण्याचे आणि त्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला; मात्र 3 तासांनंतरही ठेवीदार चिडलेलेच होते.
रायसोनी पतसंस्थेत अनियमितता असल्यामुळे त्यांच्यावर सहकार खात्याने र्निबध आणले आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पतसंस्थेच्या अनेक शाखा बंद ठेवण्यात आल्या असून ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे ठेवीदारांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. त्यामुळे पतसंस्थेच्या अध्यक्षांनी बैठक घेण्याची मागणी ठेवीदारांनी केली होती. त्यानुसार आज सायंकाळी 5 वाजता कोथरूड येथील पतसंस्थेच्या शाखेबाहेर बैठक सुरू झाली. पैशांचा जाब विचारण्यासाठी शेकडो ठेवीदार आणि खातेदार उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापासून सुरू झालेला गोंधळ संपेर्पयत सुरू होता. सर्वार्पयत आवाज जात नसल्याने रायसोनी टेबलावर चढून बोलत होते. पतसंस्थेची माहिती देत, कसे पैसे देता येतील, याबाबत रायसोनी माहिती देत असताना मध्येच काही ठेवीदारांनी गोंधळास सुरूवात केली. महिलांनी रडत पैसे देण्याची मागणी केली तर काही संतापलेल्या ठेवीदारांनी शिवीगाळ करीत रायसोनी यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी तो होवू दिला नाही. गोंधळ वाढल्याने रायसोनी बैठक सोडून शाखेत गेले. त्यानंतर 15-2क् मिनिटांनी गोंधळ कमी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा येवून ठेवीदारांशी संवाद साधला. बैठकीत माहिती देवूनही ठेवीदारांचे समाधान झाले नसल्याचे चित्र होते. त्यामुळे बैठकीनंतरही अनेक ठेवीदार त्यांच्या केबीनमध्ये जावून त्यांना जाब विचारत होते.
ठेवीदार आणि खातेदारांकडे पतसंस्था चांगल्या स्थितीत असलेल्याची माहिती योग्य पध्दतीने पोहोचली नाही. ती पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो. त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे. ज्यांना 2क् टक्के पैसे तातडीने हवे असतील त्यांनी जळगावच्या मुख्य शाखेत घेऊन घेऊन जावे, त्यासाठी त्यांची येण्या-जाण्याची, राहण्याची सोय करण्यात येईल, अशी माहिती रायसोनी
यांनी दिली. (प्रतिनिधी)
पतसंस्था आणि त्यातील पैसे पूर्णपणो सुरक्षित आहेत. मात्र ठेवीदारांनी ठेवलेले पैसे कर्जाच्या रूपात देण्यात आले आहेत. ते कर्जाचे पैसे परत लगेचच मिळवता येणार नाहीत. त्यामुळे ठेवीदारांना त्यांचे सर्व पैसे लगेचच देणो शक्य होणार नाही. यासाठी आम्ही तीन प्रकारे ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये ठेवीदारांना त्यांच्या एकूण ठेवीच्या 2क् टक्के पैसे देवून उर्वरित 8क् टक्के पैशांची पावती बनवावी किंवा 3 वष्रे पैशांची ठेवी ठेऊन दर महिन्याला व्याजाचे पैसे देऊ किंवा माझी स्वत:ची मालमत्ता ठेवीदारांनी विकत घ्याव्यात.
- प्रमोद रायसोनी
4पतसंस्थेच्या राज्यात 272 शाखा असून त्यापैकीच्या 2क्क् शाखा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. पुढील महिन्याभरात उर्वरित सर्व शाखा सुरू करण्यात येतील. पुण्यात 39 शाखा आहेत. त्यापैकी 15 शाखा मुख्य शाखांमध्ये मर्ज करण्यात आल्या आहेत. उर्वरितांपैकी 18 शाखा चालू आहेत आणि उरलेल्या लवकरच चालू करण्यात येतील.