पहिल्याच पावसात गटारी तुंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:21+5:302021-06-18T04:18:21+5:30
सांगली : शहरातील उपनगरात पहिल्याच पावसात गटारी तुंबल्याचे चित्र दिसून आले. लक्ष्मी मंदिर चौक, विश्रामबाग, शंभरफुटी रोडवरच पाणी साचून ...

पहिल्याच पावसात गटारी तुंबल्या
सांगली : शहरातील उपनगरात पहिल्याच पावसात गटारी तुंबल्याचे चित्र दिसून आले. लक्ष्मी मंदिर चौक, विश्रामबाग, शंभरफुटी रोडवरच पाणी साचून होते. महापालिकेने गटारींची स्वच्छता केली असली तरी वाहून आलेल्या काटेरी झुडपांमुळे पुन्हा पाणी रस्त्यावर साचल्याचे दिसून आले.
----
जिल्ह्यात वृक्षारोपणाला गती
सांगली : पहिल्याच आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने ग्रामीण भागात वृक्षारोपणाला गती आली आहे. मिरज तालुक्यात नुकतीच काही रस्त्यांची नव्याने कामे झाली आहेत. या रस्त्याकडेला बांधकाम विभाग, संबंधित कंत्राटदारांसह ग्रामपंचायतीच्यावतीने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे.
----
गणेशमूर्ती कामाला गती
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे वाढतच चाललेल्या निर्बंधांतून मोकळीक मिळाल्यानंतर आता गणेशमूर्ती कामाला गती घेतली आहे. यशवंत नगर, साखर कारखाना परिसरातील मूर्ती कारागिरांनी गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा मूर्ती रंगकामाला सुरुवात केली आहे.
----
पेरणीसाठी जनजागृती
सांगली : जिल्ह्यात मान्सूनने हजेरी लावली असली तरी बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस पूर्णपणे सक्रिय झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे. अगोदर पेरणी केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पेरणीसाठीची वेळ व त्याच्या नियोजनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
---
एटीएम केंद्रांवर पुन्हा गर्दी
सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रोडावलेली एटीएम केंद्रावरील गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. शहरातील गणपती पेठ, मारुती रोड, विश्रामबाग येथील एटीएम केंद्रांवर आता गर्दी दिसत आहे. सुरक्षारक्षक नसल्याने अगोदरच अस्वच्छ असलेल्या एटीएम केंद्रावर पुरेशी काळजी घेणे आवश्यक बनले आहे.