शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

मूळस्थानची पालखी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कविटा : सांगली जिल्ह्यातील विटा येथे सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि जातीय सलोखा जोपासणाºया एकाच देवाच्या दोन पालख्यांच्या शर्यतीचा नेत्रदीपक सोहळा शनिवारी विजयादशमीदिवशी विटा येथे चांगलाच रंगला. या पालखी शर्यतीत मूळस्थान श्री रेवणसिध्द देवाच्या पालखीने विट्याच्या श्री रेवणसिध्द देवाच्या पालखीस पाठीमागे टाकून शिलंगण मैदानात धाव घेत प्रथम ...

लोकमत न्यूज नेटवर्कविटा : सांगली जिल्ह्यातील विटा येथे सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि जातीय सलोखा जोपासणाºया एकाच देवाच्या दोन पालख्यांच्या शर्यतीचा नेत्रदीपक सोहळा शनिवारी विजयादशमीदिवशी विटा येथे चांगलाच रंगला. या पालखी शर्यतीत मूळस्थान श्री रेवणसिध्द देवाच्या पालखीने विट्याच्या श्री रेवणसिध्द देवाच्या पालखीस पाठीमागे टाकून शिलंगण मैदानात धाव घेत प्रथम क्रमांक पटकावला.विटा येथे विजयादशमीनिमित्त मूळस्थान श्री रेवणसिध्द व विटा येथील श्री रेवणसिध्द या देवांच्या पालखी शर्यतींचे आयोजन केले होते. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा कायम राखण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता श्री काळेश्वर मंदिरापासून पालखी शर्यतीस सुरूवात झाली. येथील गांधी चौकातून दोन्ही पालख्या खानापूर रोडवरील शिलंगण मैदानाकडे झेपावल्या. मात्र विटा बॅँकेसमोर दोन्ही बाजूच्या भाविकांनी पालख्या अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या ठिकाणी पालख्या काही सेकंदासाठी थांबल्या. त्यातून सावरत विटा रेवणसिध्दच्या पालखीने धावण्याचा वेग घेतला.विटा बसस्थानक, साई रूग्णालय, खानापूर नाक्यापर्यंत विटा व मूळस्थानच्या पालखीत मोठे अंतर होते. परंतु, सर्वात पुढे असलेली विट्याच्या श्री रेवणसिध्दची पालखी खानापूर नाक्यावर भाविकांनी रोखली. तोपर्यंत मूळस्थानच्या पालखीने शिलंगण मैदानात धाव घेऊन पहिला क्रमांक पटकाविला.यावेळी ‘श्री नाथ बाबांच्या नावानं चांगभलं.. श्री रेवणसिध्द देवाच्या नावानं चांगभलं..’चा गजर करीत भाविकांनी जल्लोष केला. त्यानंतर शिलंगण मैदानात उभ्या करण्यात आलेल्या सुमारे वीस फूट उंचीच्या रावणाचे दहन करण्यात आले. यावेळी भाविकांनी एकमेकांना आपट्याची पाने देऊन सीमोल्लंघन केले.विटा येथे शनिवारी हा नेत्रदीपक पालखी सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. शनिवारी पालखी शर्यतीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. विटा येथे विजयादशमीचा हा सोहळा संपूर्ण महाराष्टÑात प्रसिध्द आहे.