२४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST2021-04-09T04:28:56+5:302021-04-09T04:28:56+5:30

सांगली : लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात २४ हजार ५१५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस, १३ हजार ८९ जणांनी दुसरा डोस ...

The first dose was taken by 24,000 health workers | २४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस

२४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस

सांगली : लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात २४ हजार ५१५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस, १३ हजार ८९ जणांनी दुसरा डोस घेतल्याची माहिती आरोग्य समितीच्या सभेत देण्यात आली. १८ हजार ४६१ फ्रंटलाईन वर्कर्सनी पहिला, तर ५ हजार ७४९ जणांनी दुसरा डोस घेतल्याचे सांगण्यात आले.

सभापती आशाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी निजाम मुलाणी, सरिता कोरबू, विट्याचे सभापती मारुती शिंदे, तम्मणगौडा रवी-पाटील, रेश्मा साळुंखे, वैशाली कदम, आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील, क्षयरोग अधिकारी डॉ. एस. ए. जोशी, हिवताप अधिकारी शुभांगी अधटराव आदी ऑनलाईन उपस्थित होते. आशा पाटील म्हणाल्या की, ४५ वर्षांवरील ६९ हजार ८४६ लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला. ३३३ जणांना दुसरा देण्यात आला. बुधवारअखेर २ लाख ३९ हजार ३५१ जणांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले. दुसरा डोस २० हजार १९४ जणांना देण्यात आला. एकूण २ लाख ५९ हजार ५४५ जणांचे लसीकरण जाले.

जिल्हा परिषदेत होम आयसोलेशन कॉल सेंटर व बेड मॅनेजमेंट कॉल सेंटर सुरू केले असून, त्यांचे संपर्क क्रमांक असे : बेड मॅनेजमेंट कॉल सेंटर - ०२३३-२३७४९००, २३७५९००, २३७७९०० व २३७८९००. होम आयसोलेशन कॉल सेंटर : २६२५७००, २६२२७००, २६२३३००, २६२३५००, २६२३७००, २६२०१००, २६२०३००, २६२४५००, २६२२२९९, २३७५४००. महापालिका कोविड मदत केंद्र - २३७५५००, २३७४५००.

चौकट

जिल्ह्याची रुग्णसंख्या ५३ हजारांवर

जिल्ह्यात बुधवारअखेर ५३ हजार ८८८ पॉझिटिव्ह रुग्ण असून, १८२७ मृत झाले आहेत. ४८ हजार ९९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ३ हजार ६४ रुग्ण उपचाराखाली आहेत.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत मार्चपर्यंत जिल्ह्यात ग्रामीण भागात ५१ हजार ७०१ उद्दिष्ट असताना, ५५ हजार २४२ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. २३ कोटी ९४ लाख ६१ हजार रुपये वितरित केले.

Web Title: The first dose was taken by 24,000 health workers