शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विट्यात साकारतोय देशातील पहिला राष्ट्रकुल कुस्ती आखाडा : भारतातील एकमेव कुस्ती संकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 01:22 IST

सांगली जिल्ह्यातील भाळवणी (ता. खानापूर) येथील डबल महाराष्ट केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने विटा शहरापासून दोन कि.मी. अंतरावर भारतातील पहिला अत्याधुनिक व सर्वसोयीनियुक्त असा

ठळक मुद्देचंद्रहार पाटील यांचा पुढाकार : सुमारे ११ कोटींचा खर्च

दिलीप मोहिते ।विटा : सांगली जिल्ह्यातील भाळवणी (ता. खानापूर) येथील डबल महाराष्टÑ केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने विटा शहरापासून दोन कि.मी. अंतरावर भारतातील पहिला अत्याधुनिक व सर्वसोयीनियुक्त असा राष्टÑकुल कुस्ती आखाडा उभा राहत आहे. सुमारे ११ कोटी रूपये खर्चाच्या या कुस्ती संकुलात पाचशे मल्लांना लाल माती व मॅटवरील कुस्तीचे धडे दिले जाणार आहेत.

भाळवणी येथील डबल महाराष्टÑ केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांना, ग्रामीण भागातील मुलांना कोल्हापूर, पुणेसारख्या ठिकाणी कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात येत नाही, त्यामुळे या भागात कुस्ती संकुलाची उभारणी करण्याची संकल्पना सुचली. ही संकल्पना त्यांचे वडील सुभाष (भाऊ) पाटील यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ विटा नगरपरिषद हद्दीतील स्वमालकीची तीन एकर जागा या राष्टÑकुल कुस्ती संकुलासाठी दिली. या तीन एकर विस्तीर्ण जागेत भारतातील हे पहिले कुस्ती संकुल उभे राहत असून त्याच्या प्रत्यक्ष कामालाही येत्या चार दिवसात सुरूवात होत आहे.

या आखाड्यात एकाचवेळी ५०० मुलांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी चार कुस्ती प्रशिक्षक नियुक्त केले आहेत. मुलांच्या राहण्याची सोय आहे. मात्र, मुलांनी स्वत: जेवण तयार करण्याचे आहे. त्यांना दररोज लागणारा भाजीपाला उत्पादन करण्यासाठी आणखी तीन एकर जमिनीची व्यवस्था करण्यात आली आहे.या संकुलात जलतरण तलाव, सिन्थेटिक्स (रबरी) धावपट्टी, दुधासाठी १०० म्हैशींचा गोठा, लाल मातीचा आखाडा, दोन मॅट आखाडे, प्रशिक्षणार्थी मुलांसाठी पाच शालेय स्कूल बसेस यासह अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत.आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्ल घडतीलअत्याधुनिक व सर्व सोयीनियुक्त अशी कुस्ती संकुले परदेशात आहेत. परंतु, विटासारख्या शहरात अशा राष्टÑकुल कुस्ती संकुलाची उभारणी होत आहे. येत्या चार दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. आपल्या भागातील मुलांसाठी हे संकुल प्रेरणादायी ठरणार आहे. या कुस्ती संकुलात आंतरराष्टÑीय पातळीवर खेळणारे मल्ल तयार करण्यासाठी आगामी काळात कटिबध्द राहणार असल्याची ग्वाही या राष्टÑकुल कुस्ती संकुलाचे प्रमुख डबल महाराष्ट केसरी चंद्रहार पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :SangliसांगलीIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र