शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेत भरदिवसा गोळीबार, हल्लेखोराची गोळी चुकवल्याने एकजण बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:51 IST

पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी: दोघे ताब्यात

मिरज : मिरजेत मंगळवार पेठेत चर्चजवळ पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी व गावठी पिस्तुलातून भरदिवसा गोळीबार करून सलून दुकानाची मोडतोड केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे.मिरजेतील वडर गल्लीत तरुणांच्या जुन्या वादातून ही घटना घडली. बुधवारी दुपारी दीड वाजता चर्चजवळ वैभव यादव याच्या सलून दुकानात रोहन कलकुटगी (रा. वडर गल्ली, मिरज) व विकी कलगुटगी हे दोघे बसले होते. यावेळी गणेश कलगुटगी व त्याचे पाच सहा साथीदार तेथे आले. गणेश व त्याच्या साथीदारांनी रोहन यास शिवीगाळ करीत काठ्याने हल्ला चढवला. यावेळी गणेश कलगुटगी याने गावठी पिस्तुलातून रोहन याच्यावर गोळी झाडली. मात्र, रोहन याने गोळी चुकवल्याने तो बचावला. ही गोळी रस्त्यावर आदळली. यावेळी हल्लेखोरांनी वैभव यादव यांच्या सलून दुकानातील सर्व साहित्याची मोडतोड करीत नुकसान केले. रोहन व विकी यांनी हल्लेखोरांना प्रतिकार केल्याने सर्वांनी तेथून पलायन केले. गोळीबाराच्या आवाजामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली. या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात दहशत निर्माण झाली होते. याबाबत माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक प्रणील गिलडा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे, मिरज शहर निरीक्षक किरण रासकर घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलिसप्रमुख संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. झाडलेल्या गोळीचे रस्त्यावर पडलेले रिकामे काडतूस पोलिसांनी जप्त केले. याबाबत शहर पोलिसात रोहन संजय कलगुटगी याने गणेश तानाजी कलगुटगी, चेतन सुरेश कलगुटगी, सुरज कोरे व त्यांचे चार अन्य साथीदार अशा सात जणांविरुद्ध गोळीबार व मारहाणीची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी गणेश व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. फरारी गणेश याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.संशयितांवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखलगणेश कलगुटगी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, काही महिन्यांपूर्वी गणेश याच्याकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल जप्त केले होते. याची माहिती रोहन याने पोलिसांना दिल्याचा संशय गणेश यास होता. रोहन हा एका तडीपार गुन्हेगारासोबत फिरत होता. या रागातून गणेश याने रोहन याच्यावर हल्ला चढवल्याची रोहन याची तक्रार आहे. गणेश कलकुटगी व सूरज कोरे यांच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत.