शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील आटुगडेवाडीत ढाब्यावर गोळीबार, मद्यधुंद तरुणांच्या दोन गटांत हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 17:32 IST

‘मी सभापती आहे. गोळ्या घालीन’ अशी दिली धमकी

कोकरूड : आटूगडेवाडी-मेणी (ता. शिराळा) येथील भाऊच्या ढाब्यावर किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीनंतर शाहूवाडी तालुक्यातील माजी सभापती बबन पाटील याने हवेत चार गोळ्या झाडल्या. याप्रकरणी कोकरूड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. संशयित बबन पाटील याला अटक करण्यात आली आहे.                                   उंडाळे (ता. कराड) येथील जयेश जयवंत निकम (वय २६) व त्याचे मित्र आटूगडेवाडी-मेणी (ता. शिराळा) येथील खिंडीत असणाऱ्या भाऊचा ढाबा येथे जेवायला आले होते. त्याच वेळी शाहुवाडी तालुक्यातील माजी सभापती बबन ऊर्फ आनंद शंकर पाटील (रा. शिराळे वारुण, ता. शाहूवाडी) हे आपल्या समर्थकांसाेबत जेवण करण्यासाठी आले होते. ढाब्याच्या दरवाजातून आत-बाहेर जात असताना फिर्यादी जयेश निकम याचा बबन पाटील याला धक्का लागला. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. बबन पाटील म्हणाले, ‘मी सभापती आहे. मला धक्का काय देतोयस काय?’ यावरून दोन्ही गटातील युवक एकमेकावर धावले. प्रथम शाब्दिक चकमक, झटापट झाली. यातील काहींनी मद्यप्राशन केले हाेते. यामुळे माेठा गाेंधळ उडाला. हाणामारी सुरू झाली. यावेळी माजी सभापती बबन पाटील याने खिशातील काळ्या रंगाचे पिस्तूल काढून दमदाटी केली. हवेत चार गोळ्या झाडून दहशत निर्माण करीत ‘मी सभापती आहे. गोळ्या घालीन’ अशी धमकी दिली.याबाबतची फिर्याद जयेश जयवंत निकम यांनी कोकरूड पोलिसात दिली असून संशयित बबन पाटील यास अटक करून पिस्तूल व चार पुंगळ्या जप्त करण्यात आल्या. घटनास्थळी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट देऊन तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या प्रकरणाचा अधिक तपास सहयक निरीक्षक महेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिवाजी जाधव करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबार