हळद फॅक्टरीला आग; पंधरा लाखांची हानी

By Admin | Updated: June 8, 2014 00:38 IST2014-06-08T00:38:16+5:302014-06-08T00:38:16+5:30

मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये १५ लाखांचे नुकसान

Fire to turmeric factory; Loss of fifteen lakh | हळद फॅक्टरीला आग; पंधरा लाखांची हानी

हळद फॅक्टरीला आग; पंधरा लाखांची हानी

कुपवाड : मिरज औद्योगिक वसाहतीमधील श्रीकृष्ण स्पायसेस प्रा. लि. या हळद फॅक्टरीला आज, शनिवारी पहाटे शॉर्टसर्किटने आग लागून १५ लाखांचे नुकसान झाले. आगीत तीनशे पोती हळकुंड व हळद पावडर जळून खाक झाली.
मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये धनाजी दत्तात्रय जाधव (वय ३५) रा. सांगली यांच्या मालकीचा हळद कारखाना आहे. या कारखान्यात आज, शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. प्रारंभी छोट्या स्वरुपात लागलेल्या आगीने नंतर रौद्ररूप धारण केले. त्यानंतर रखवालदारांनी घटनेची माहिती मालकांना दिल्यानंतर महापालिका अग्निशमन विभागाच्या दोन वाहनांनी आग आटोक्यात आणली. आगीत ८० किलो वजनाची तीनशे पोती हळकुंड व ५० किलो वजनाची दीडशे पोती हळद पावडर भस्मसात झाली. एकूण पंधरा लाखांचा माल जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले. मालक जाधव यांनी कुपवाड एमआयडीसी पोलिसांत वर्दी दिली आहे. हवालदार बाळासाहेब मंडले तपास करीत आहेत. (वार्ताहर)


Web Title: Fire to turmeric factory; Loss of fifteen lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.