सावळीतील हरी ओम फूड प्रॉडक्ट्सला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 12:12 PM2021-04-24T12:12:06+5:302021-04-24T12:14:13+5:30

Fire Sangli : सावळी (ता.मिरज) येथील हरी ओम फूड प्रोडक्ट्स या फरसाणा व बेकरी उत्पादन करणाऱ्या कंपनीला शनिवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.आगीत कच्चा व तयार झालेला माल तसेच मशिनरी यांचे अंदाजे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

Fire at Om Hari Food Products in the shadows | सावळीतील हरी ओम फूड प्रॉडक्ट्सला आग

सावळी (ता.मिरज) येथील हरी ओम फूड प्रोडक्ट्सला लागलेली आग महापालिका अग्निशमन दलाचे जवानांनी आटोक्यात आणली.

googlenewsNext
ठळक मुद्देसावळीतील हरी ओम फूड प्रॉडक्ट्सला आग शॉर्ट सर्किटमुळे आग : ७० लाखांचे नुकसान

कुपवाड : सावळी (ता.मिरज) येथील हरी ओम फूड प्रोडक्ट्स या फरसाणा व बेकरी उत्पादन करणाऱ्या कंपनीला शनिवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.आगीत कच्चा व तयार झालेला माल तसेच मशिनरी यांचे अंदाजे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

सावळीमध्ये तानंग रस्तावर सुरेश माळी यांचा हरी ओम फूड प्रोडक्ट्स हा फरसाणा निर्मितीचा कारखाना आहे. दरम्यान, या कारखान्यात शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धूराचे लोट बाहेर येत असल्याचे रखवालदाराच्या निर्दशनास आले. त्यांनी तातडीने ही माहिती मालक माळी याना दिली.माळी यांनी आगीची माहिती महापालिका अग्निशमन विभागाला फोन वरून दिली. अग्निशमन विभाग तत्काळ घटनास्थळी दाखल झाला.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन वाहनांच्या मदतीने तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची माहिती दिली. आगीत कच्चा व तयार झालेला फरसाणा तसेच बेकरी उत्पादन व मशिनरी यांचे अंदाजे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली आहे.

Web Title: Fire at Om Hari Food Products in the shadows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.