जतमध्ये खत गोदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 21:06 IST2017-10-07T21:06:07+5:302017-10-07T21:06:07+5:30
जत : जत शहरातून जाणाºया विजापूर ते गुहागर राज्यमार्गालगत असलेल्या खत गोदामाला अचानक आग

जतमध्ये खत गोदामाला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत शहरातून जाणाºया विजापूर ते गुहागर राज्यमार्गालगत असलेल्या खत
गोदामाला अचानक आग लागून सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ही
घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी
जत पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
राज्यमार्गालगत असलेल्या जत बाजार समिती व्यापारी संकुलात आप्पू निलजगी
यांचे मल्लिकार्जुन क्रषी सेवा केंद्र आहे. खाली दुकान व वरील मजल्यावर
गोदाम आहे .आज सायंकाळी अचानक गोदामाला आग लागली , यावेळी आतील संपूर्ण
साहित्य जळून भस्मसात झाल आहे .आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण
समजू शकले नाही . येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी पाणी मारुन आग
आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला , रात्री उशीरापर्यंत यासंदर्भात पोलिसात
गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता . त्यामुळे जत शहरात या घटनेची उलट सुलट
चर्चा सुरू आहे .