आष्ट्यात शॉर्टसर्किटमुळे आग, लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:50+5:302021-03-30T04:17:50+5:30
आष्टा : येथील काशिलिंगनगरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागून स्नानगृहातील साहित्यासह संसारोपयोगी साहित्याचे सुमारे लाखाचे नुकसान झाले. ही घटना ...

आष्ट्यात शॉर्टसर्किटमुळे आग, लाखाचे नुकसान
आष्टा : येथील काशिलिंगनगरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागून स्नानगृहातील साहित्यासह संसारोपयोगी साहित्याचे सुमारे लाखाचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सकाळी आठच्या दरम्यान घडली.
काशिलिंगनगरमध्ये विजय सत्तू ढोले यांचे घर आहे. सकाळी घरातील स्नानगृहातून अचानक धूर येऊ लागला. याबाबत ढोले यांनी आष्टा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. आष्टा पालिकेची अग्निशमन गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
अरुण टोमके, अय्याज लतीफ, पोपट शिंदे, सचिन मोरेसह आष्टा पोलीस ठाण्याचे हवालदार शिवाजी काकतकर व अय्याज शेख तातडीने दाखल झाले. पालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. संसारोपयोगी साहित्याचे लाख ते दीड लाखाचे नुकसान झाले.