रेठरे धरणमध्ये सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:23 IST2021-04-03T04:23:19+5:302021-04-03T04:23:19+5:30

रेठरे धरण-पेठ रस्त्यावर प्रभाग क्र. १ मध्ये विलास बाबू मदने यांचे दुमजली घर आहे. मंगळवारी पहाटे घरातील वीज गेल्यानंतर ...

Fire due to gas leak in cylinder in Rethare dam | रेठरे धरणमध्ये सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे आग

रेठरे धरणमध्ये सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे आग

रेठरे धरण-पेठ रस्त्यावर प्रभाग क्र. १ मध्ये विलास बाबू मदने यांचे दुमजली घर आहे. मंगळवारी पहाटे घरातील वीज गेल्यानंतर पहाटे साडेपाच वाजता नंदा मदने या स्वयंपाकघरात गॅस शेगडी सुरू करत होत्या. त्यावेळी रेग्युलेटरमधून गॅस गळती होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. गळतीमुळे गॅसने पेट घेतल्याने अचानक भडका उडाला. त्यामुळे घरातील सदस्य घाबरून गेले. पेटता सिलिंडर त्यांनी घराबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत फेकला. सिलिंडरच्या रेग्युलेटरमधून गॅस बाहेर पडून सिलिंडर पेटत होता. सुमारे दहा फूट उंचीवर ज्वाला पसरत होत्या. मदने त्यांचा मुलगा प्रशांत याने सिलिंडरवर ओली चादर टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आग आटाेक्यात येत नव्हती. यावेळी उमेश मदने, मानाजी धुमाळ यांनी पेटत्या सिलिंडरवर वाळूमिश्रित माती टाकून आग आटाेक्यात आणली.

Web Title: Fire due to gas leak in cylinder in Rethare dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.