महापालिकेचीच अग्निशमन यंत्रणा कालबाह्य

By Admin | Updated: August 11, 2015 00:39 IST2015-08-11T00:39:58+5:302015-08-11T00:39:58+5:30

नोटिसांचा खेळ : अग्निशमन विभागासह १२ विभागांच्या बुदल्यांचे रिफिलिंगच नाही--खेळ आगीशी खेळ जिवाशी-३

Fire control system expired from municipal corporation | महापालिकेचीच अग्निशमन यंत्रणा कालबाह्य

महापालिकेचीच अग्निशमन यंत्रणा कालबाह्य

अविनाश कोळी-सांगली -‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ या म्हणीप्रमाणे महापालिकेची अवस्था झाली आहे. आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक कायद्याचा बडगा दुसऱ्यांवर उगारणाऱ्या महापालिकेच्या सर्वच विभागातील अग्निशमन यंत्रणा कालबाह्य झाली आहे. अग्निशमन विभागासह १२ विभागांमधील १०९ अग्निरोधक बुदल्या (एक्स्टिंगीशर) कालबाह्य झाल्या असून, त्यांचे रिफिलिंग केलेले नाही.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील विविध व्यावसायिक, उद्योजकांना आगप्रतिबंधक व जीवसंरक्षण कायद्याच्या नोटिसा महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून बजावण्यात येत असतात. मात्र या अग्निशमन विभागासहीत महापालिकेच्या सर्वच विभागातील अग्निशमन यंत्रणा कालबाह्य झालेली आहे. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांवरून ही बाब उजेडात आली आहे. त्यामुळे अग्निशमन विभागाने शहर अभियंत्यांना नोटीस बजावली आहे. वास्तविक फेब्रुवारी व मे २०१४ मध्येच या सर्व विभागांच्या अग्निरोधक बुदल्यांची मुदत संपली असताना, त्यांना तब्बल १ वर्षाने म्हणजे मे २०१५ मध्ये नोटीस देण्यात आली आहे.

विभाग व कालबाह्य झालेल्या बुदल्या
विभाग बुदल्या रिफिलिंगची तारीख
मुख्यालय व रेकॉर्ड २९३/२/२0१४
शाळा क्रमांक ११८६/१0/ २0१४
अतिथीगृह७१/५/२0१४
दीनानाथ नाट्यगृह१३१/५/२0१४
स्टोअर डिपार्टमेंट४१/५/२0१४
एलबीटी विभाग ६१/५/२0१४


विभाग बुदल्या रिफिलिंगची तारीख
हिराबाग वॉटर वर्क्स१७१/५/२0१४
घरपट्टी ५१/५/२0१४
आर. सी. एच. ५१/५/२0१४
पंपिंग स्टेशन माळ बंगला२१/५/२0१४
फायर स्टेशन टिंबर एरिया२६/१0/२0१४
फायर स्टेशन क्र. ११६/१0/२0१४

Web Title: Fire control system expired from municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.