सांगलीत शुक्रवारी तलवारबाजी निवड चाचणी
By Admin | Updated: January 14, 2015 23:21 IST2015-01-14T22:20:59+5:302015-01-14T23:21:10+5:30
या स्पर्धा १६ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता खणभागातील आझाद व्यायाम मंडळात सुरू होतील

सांगलीत शुक्रवारी तलवारबाजी निवड चाचणी
सांगली : सांगली अॅमॅच्युअर फेन्सिंग असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय युथ तलवारबाजी (फेन्सिंग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी दिली. या स्पर्धा १६ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता खणभागातील आझाद व्यायाम मंडळात सुरू होतील. १ जानेवारी १९९२ नंतरचा जन्म असलेल्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेतील विजेत्यांना व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेतून सेलू (जि. परभणी) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेसाठी संघ निवडण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी शुभम् जाधव व प्रताप पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रा. जगदाळे यांनी केले आहे.