शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

साठ वर्षांपेक्षा जुन्या अपार्टमेंटच्या पुनर्विकासासाठी अर्थसहाय्य; सांगली, कोल्हापूरसह १.३० लाख गृहनिर्माण संस्थांना होणार लाभ

By संतोष भिसे | Updated: December 27, 2024 12:53 IST

‘स्वयंपूर्ण विकास योजना’ अंतर्गत या संस्थांना वाजवी व्याजदरात कर्ज पुरवठा केला जाईल

संतोष भिसेसांगली : साठ वर्षांपेक्षा जुन्या अपार्टमेंटच्या पुनर्विकासासाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बांधकाम व्यावसायिकामार्फत पुनर्विकास न करता स्वत: करू इच्छिणाऱ्या अपार्टमेंटधारकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेकडो अपार्टमेंटनाही याचा लाभ होणार आहे.राज्यभरातील एक लाख ३० हजारहून अधिक नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांना याचा लाभ होणार आहे. या इमारतींचा स्वत:च पुनर्विकास करण्याची रहिवाशांची तयारी आहे, मात्र त्यासाठी वित्तपुरवठा ही प्रमुख अडचण होती. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाने पुढाकार घेतला आहे. ‘स्वयंपूर्ण विकास योजना’ अंतर्गत या संस्थांना वाजवी व्याजदरात कर्ज पुरवठा केला जाईल. त्यासाठी बँका तसेच खासगी वित्त कंपन्यांचीही मदत घेतली जाणार आहे. स्टील, सिमेंट, विद्युत उपकरणे बनविणाऱ्या कंपन्यांकडून थेट साहित्य खरेदी करून बाजारभावापेक्षा कमी दरात संस्थांना देण्यात येणार आहे.राज्यातील अनेक शहरांमध्ये एक लाखांहून अधिक नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना सहकारी बँका मदत करतील. राज्य सहकारी बॅंक व जिल्हा सहकारी बँकाही पुढाकार घेणार आहेत. महासंघाने सहकार विभागाच्या स्वयंपूर्ण विकास नियमांमध्ये दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानुसार सहकार विभागाचे आयुक्त दीपक तावरे यांनी यातील अनेक दुरुस्त्या मंजूर केल्या. त्यामुळे पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.नव्या वर्षात म्हणजे २०२५ पासून ‘स्वयंपूर्ण विकास योजना’ सुरू केली जाणार आहे. राज्यभरातील सोसायट्यांच्या सदस्यांना ऑनलाईन प्रक्रिया राबविता येणार आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, यासाठी शासन स्वतंत्र विभाग सुरू करणार आहे. हा विभाग फक्त पुनर्विकासासंदर्भातील काम करेल. संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधायचा आणि दीड महिन्यात मंजुरी द्यायची जबाबदारी या विभागाची असेल.याकामी राज्य शिखर बॅंकेला व मुंबै बॅंकेला नोडल एजन्सी केली आहे. आणखी काही बॅंका पुढे आल्यास त्यांनाही सामावून घेऊ. त्या पुनर्विकासासाठी कर्ज उपलब्ध करून देतील. ही प्रक्रिया अतिशय सुटसुटीत असेल.

फक्त १०० रुपये मुद्रांक शुल्कफडणवीस म्हणाले, या कामाच्या करारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणे फक्त १०० रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारले जाईल. खूप मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क भरावे लागणार असल्याने अनेक कामांची सुरुवातच होत नाही, हे लक्षात घेऊन ते कमी करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील पुनर्विकासासाठी महापालिका शुल्कात काही सवलती देण्याचाही विचार सुरू आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरGovernmentसरकारHomeसुंदर गृहनियोजन