वित्तीय संस्थेत राजकारण नसावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST2021-08-15T04:27:56+5:302021-08-15T04:27:56+5:30
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेसारख्या मोठ्या वित्तीय संस्थेमध्ये आम्ही कधीच राजकारण आणले नाही. यापुढेहीते नसावे हीच अपेक्षा आहे. त्यामुळे ...

वित्तीय संस्थेत राजकारण नसावे
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेसारख्या मोठ्या वित्तीय संस्थेमध्ये आम्ही कधीच राजकारण आणले नाही. यापुढेहीते नसावे हीच अपेक्षा आहे. त्यामुळे निवडणूक न होता चांगले संचालक मंडळ निवडले जावे, असे मत काँग्रेसचे युवा नेते व जिल्हा बँक संचालक विशाल पाटील यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले की, केवळ जिल्हा बँकच नव्हे, तर कोणत्याही वित्तीय संस्थेत राजकारण येता कामा नये. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्वांचे प्रयत्न असतील. आम्हीसुद्धा त्याच मताचे आहोत. राज्यातील एक चांगली बँक म्हणून सांगली जिल्हा बँकेचा लाैकिक आहे. त्यामुळे या वित्तीय संस्थेत चांगले चेहरे देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकरी, सामान्य नागरिकांचा विश्वास असलेली ही बँक असल्याने पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला होता. यावेळीही तो करण्याचा प्रयत्न आम्ही करू.