सागाव येथे पूरग्रस्तांना अर्थसाहाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST2021-08-14T04:32:32+5:302021-08-14T04:32:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथे महापुरात नुकसान झालेल्या आठ कुटुंबांना माऊली फाऊंडेशनतर्फे प्रत्येकी दहा हजार ...

सागाव येथे पूरग्रस्तांना अर्थसाहाय
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथे महापुरात नुकसान झालेल्या आठ कुटुंबांना माऊली फाऊंडेशनतर्फे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
माऊली फाऊंडेशनने गावात समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. यंदा महापुराने सागाव येथील बहुतांशी लोकांची घरे पडून ते बेघर झाले आहेत. अशा कुटुंबांना आलेल्या अडचणीतून दिलासा देण्याच्या हेतूने फाऊंडेशनने प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत केली आहे.
यावेळी फाऊंडेशनचे प्रदीप शेटे, संग्राम पवार, प्रशांत पवार, भगवान पाटील, गजानन पाटील, संदीप पाटील, रवी नांगरे, अजित कांबळे, सागर सूर्यगंध, तुषार कांबळे आदी उपस्थित होते.
130821\1745-img-20210813-wa0011.jpg
फोटो ओळी - सागाव येथे महापूराने घरे पडून बेघर झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत करताना मान्यवर