अचकनहळ्ळीतील पूरग्रस्त शेतकऱ्यास आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:27 IST2020-12-06T04:27:53+5:302020-12-06T04:27:53+5:30
जत : अचकनहळ्ळी (ता. जत) येथील शेतकरी विनायक परशुराम शिंदे (वय ४५) यांचे ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ...

अचकनहळ्ळीतील पूरग्रस्त शेतकऱ्यास आर्थिक मदत
जत : अचकनहळ्ळी (ता. जत) येथील शेतकरी विनायक परशुराम शिंदे (वय ४५) यांचे ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे माेठे नुकसान झाले. शासनाकडून त्यांना पन्नास हजार रुपये मदतीचा धनादेश आमदार विक्रम सावंत यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
ऑक्टाेबरमध्ये अचकनहळ्ळी गावालगतच्या ओढ्याला पूर आला होता. शेतातून ओढा पार करून घरी जात असताना शिंदे यांची बैलजोडी, पेरणीसाठी वापरण्यात येणारी शेती अवजारे, बैलगाडी, मोबाईल व रोख पाच हजार रुपये पाण्यात वाहून गेल्याने सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले होते. महसूल विभागाच्यावतीने घटनेचा पंचनामा करून मदतीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता. शासनाकडून शिंदे यांना ५० हजार रुपयांचा मदतीचा धनादेश आमदार विक्रम सावंत यांच्याहस्ते देण्यात आला. यावेळी निवासी नायब तहसीलदार डी. पी. माळी, माजी सभापती बाबासाहेब कोडग, नितीन शिंगाडे आदी उपस्थित होते.
फोटो : ०५ जत १