जांभूळवाडी, धुमाळवाडीतील कुटुंबांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:20 IST2021-06-05T04:20:47+5:302021-06-05T04:20:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे, कौलाचे छत उडून जाऊन नुकसान झालेल्या जांभूळवाडी व धुमाळवाडी येथील ...

Financial assistance to families in Jambulwadi, Dhumalwadi | जांभूळवाडी, धुमाळवाडीतील कुटुंबांना आर्थिक मदत

जांभूळवाडी, धुमाळवाडीतील कुटुंबांना आर्थिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे, कौलाचे छत उडून जाऊन नुकसान झालेल्या जांभूळवाडी व धुमाळवाडी येथील दोन कुटुंबांना जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. युवा नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते मदतीचे धनादेश देण्यात आले.

सर्जेराव बांदल (जांभूळवाडी), महादेव धुमाळ (धुमाळवाडी) यांच्या घरांचे छत एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्याने उडून गेले होते. यामध्ये या कुटुंबांचे नुकसान झाले होते. युवा नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते अभियानच्या वतीने त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली.

यावेळी राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील, जांभूळवाडीचे माजी सरपंच प्रभाकर बांदल, दिलीप बांदल, शरद बांदल, विशाल बांदल, सचिन झापटे, रवींद्र पाटील, शहाजी धुमाळ, संपत धुमाळ उपस्थित होते.

फोटो ओळी- जांभूळवाडी, धुमाळवाडी येथील कुटुंबांना प्रतीक पाटील यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयबापू पाटील, आनंदराव पाटील, इलियास पिरजादे आदी उपस्थित होते.

Web Title: Financial assistance to families in Jambulwadi, Dhumalwadi