वळसंग येथे वित्त कोरोना प्रतिबंधक गोळ्या वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:21 IST2021-06-04T04:21:34+5:302021-06-04T04:21:34+5:30

संख : वळसंग (ता. जत) येथे वित्त आयोग निधीतून कोरोना प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप युवा नेते प्रतीक पाटील यांच्या ...

Finance Corona preventive pills distributed at Walsang | वळसंग येथे वित्त कोरोना प्रतिबंधक गोळ्या वाटप

वळसंग येथे वित्त कोरोना प्रतिबंधक गोळ्या वाटप

संख : वळसंग (ता. जत) येथे वित्त आयोग निधीतून कोरोना प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप युवा नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. राष्ट्रवादीचे नेते, माजी पंचायत समिती सदस्य एम. के. पुजारी यांंच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, म्हाळाप्पा पुजारी, सरचिटणीस बाबासाहेब पाटील, खानापूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुशांत देवकर, सरपंच पूजा रमेश माळी, उपसरपंच वंदना प्रकाश निळे, ग्रामपंचायत सदस्य के. डी. पुजारी, शंकर कांबळे, विश्वनाथ माळी, संजय शिंदे उपस्थित होते.

फोटो ओळ : वळसंग (ता. जत) येथे कोरोना प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप युवा नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Finance Corona preventive pills distributed at Walsang