दिघंची परिसरात सुगी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:27 IST2021-04-02T04:27:44+5:302021-04-02T04:27:44+5:30
दिघंची/अमोल काटे : दिघंची (ता. आटपाडी) परिसरात रब्बी पिकांची काढणी व मळणी अंतिम टप्प्यात आहे. हरभऱ्याला ४५०० ते ४७०० ...

दिघंची परिसरात सुगी अंतिम टप्प्यात
दिघंची/अमोल काटे : दिघंची (ता. आटपाडी) परिसरात रब्बी पिकांची काढणी व मळणी अंतिम टप्प्यात आहे. हरभऱ्याला ४५०० ते ४७०० भाव मिळाला आहे. परिसरात गव्हाचे विक्रमी उत्पादन घेण्यात आले आहे. मजुरांची टंचाई असल्याने गव्हाची कापणी व मळणी एकाच वेळी करण्यासाठी तेलंगणा, हरियाणा, पंजाब या राज्यांतून दाखल झालेल्या हार्वेस्टर यंत्राचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
पारंपरिक पद्धतीने गहू काढण्यासाठी एकराला दहा ते बारा महिला मजूर व चार हजारांपर्यंत मजुरी लागते. त्यामुळे शेतकरी काढणी व मळणी करण्यासाठी हार्वेस्टर यंत्राचा वापर करताना दिसून येत आहे. एका तासात एकरातील गहू काढून होत असल्याने यांत्रिकीकरणास शेतकऱ्यांची पसंती आहे.
चौकट
दिघंची परिसरात गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून महिनाभरापासून ३५० ते ४०० एकरांतील गहू काढणी, मळणीसाठी हार्वेस्टरला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. याद्वारे एकरातील गहू तासात निघत असून त्यासाठी ३००० ते ३३०० रुपये मोजावे लागत आहेत.
- रामभाऊ शिंदे, हार्वेस्टर मशीनमालक