‘सोनहिरा’कडून २४०८ रुपये अंतिम दर

By Admin | Updated: September 26, 2015 00:19 IST2015-09-25T22:48:13+5:302015-09-26T00:19:02+5:30

‘एफआरपी’ ३०८ प्रमाणे जमा होणार : साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत मोहनराव कदम यांची घोषणा

Final rate of `2408 by Sonihira | ‘सोनहिरा’कडून २४०८ रुपये अंतिम दर

‘सोनहिरा’कडून २४०८ रुपये अंतिम दर

वांगी : सोनहिरा सहकारी साखर कारखाना उसाला ‘एफआरपी’प्रमाणे ३०८ रुपये सोमवार, दि. २८ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. एकूण प्रतिटन २४०८ रुपये अंतिम दर दिला आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी केले. वांगी (ता. कडेगाव) येथे कारखान्याच्या बावीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून कदम बोलत होते.यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, जिल्हा बॅँकेचे संचालक महेंद्र लाड, युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष इंद्रजित साळुंखे, भीमराव मोहिते, राम उगळे, पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठल मुळीक, सखाराम सूर्यवंशी, प्रकाश जाधव उपस्थित होते.कदम म्हणाले की, कारखान्याने मागील गळीत हंगामात ७ लाख ४६ हजार टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत शेतकऱ्याला प्रतिटन २१०० रूपये दिले असून उर्वरित ३०८ रुपये दि. २८ रोजी जमा करणार आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ताकारी व टेंभू योजनांमुळे उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्यामुळे गाळप क्षमता प्रतिदिनी साडेसात हजार टन करण्यात येणार आहे. आसवनी प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येणार असून ती प्रतिदिन ६० हजार लिटर करण्यात येणार आहे. उसाला जादा दर देता यावा यासाठी प्रतिदिन ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ९२ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. ते म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांसाठी ऊस ठिबक सिंचन करण्यासाठी मदत करणार आहे. यावेळी उपाध्यक्ष बापूसाहेब पाटील, पी. सी. जाधव, डी. के. कदम, जयसिंग कदम, मधुकर सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यकारी संचालक शरद कदम यांनी स्वागत केले. अनिल कदम यांनी नोटीस वाचन, तर संजय पाटील यांनी अहवाल वाचन केले. युवराज कदम यांनी आभार मानले. (वार्ताहर)


शासनाने ५० टक्के दराने खते द्यावीत
महागाईमुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी रासायनिक खताचे दर ५० टक्के कमी करावेत, त्यामुळे ऊस उत्पादकांना उत्पादन खर्च कमी होऊन आर्थिक पाठबळ मिळण्यास मदत होणार आहे, असे मत मोहनराव कदम यांनी व्यक्त केले.
टेंभू योजनांमुळे उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्यामुळे गाळप क्षमता प्रतिदिनी साडेसात हजार टन करण्यात येणार आहे. आसवनी प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येणार असून ती प्रतिदिन ६० हजार लिटर करण्यात येणार आहे.
यावर्षीपासून कमी क्षेत्रात जास्त ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला २५ हजार, १५ हजार व १० हजार अशी आडसाली, पूर्वहंगामी व सुरू उसासाठी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

Web Title: Final rate of `2408 by Sonihira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.