शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वसुलीसाठी फायनान्स एजंटांकडून फिल्मी स्टाईलने वाहनाचा पाठलाग, आटपाडी ते दिघंची रस्त्यावर थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 13:39 IST

दिघंची-पंढरपूर व दिघंची-आटपाडी महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांनी ठाण मांडले आहे

आटपाडी : आटपाडी ते दिघंचीदरम्यान महामार्गावर एका मालवाहतूक वाहनाचा फायनान्स कंपनीच्या एजंटांनी कर्ज वसुलीसाठी फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग केला. एकेरी मार्गिकेत घुसून तब्बल १२ किलोमीटरचा पाठलाग करत बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर संबंधित वाहन पकडले. दोन्ही वाहने एकेरी मार्गिकेत घुसल्याने तब्बल तीन ठिकाणी अपघात होता होता टळला. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजता घडली.गेल्या काही दिवसांपासून आटपाडी व दिघंची परिसरामध्ये चारचाकी व मालवाहतूक वाहनांसाठी फायनान्स करणाऱ्या कंपन्यांच्या वसुली एजंटाचा सुळसुळाट झाला आहे. नियम धाब्यावर बसवून कारभार सुरू आहे. महामार्गावरच थांबून आटपाडी ते दिघंची व दिघंची ते पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांवर नजर ठेवली जाते. थकबाकी असलेले वाहन दिसताच चालकास अडवून हफ्त्याबाबत विचारणा केली जाते. मात्र, अनेकदा वाहनचालकाला या अडवणुकीचा अंदाज येत नाही. वाहन न थांबवता वेगाने पुढे नेले जाते. अशा वेळी वसुली एजंट त्या वाहनांचा पाठलाग करतात. मात्र पाठलाग करताना महामार्गावरील अन्य वाहनांना अडथळा निर्माण केला जातो.बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान आटपाडीहून दिघंचीमार्गे माळशिरसकडे निघालेला एक मालवाहतूक टेम्पो अडवण्याचा प्रयत्न या वसुली एजंटांनी केला. मात्र, चालकास अंदाज न आल्याने त्याने वाहन तसेच पुढे पळवले. यावेळी वसुली एजंटांनीही त्याचा पाठलाग करत आपली माेटार एकेरी मार्गिकेत घुसवली. भरधाव वेगाने फिल्मी स्टाईल तब्बल बारा किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. यादरम्यान दिघंचीहून आटपाडीकडे येणाऱ्या तीन वाहनांना अपघात हाेता हाेता बचावला.आटपाडी शहरातून सुरू झालेला हा पाठलाग दिघंचीतील पेट्रोल पंपावर थांबला. पेट्रोल पंपासमोर संबंधित एजंटांनी वाहन चालकाला थांबवून दमदाटी सुरू केली. थरारक पाठलाग व वाहनचालकास सुरू असलेली दमदाटी पाहून पेट्रोल पंपावर माेठी गर्दी झाली. संतप्त नागरिक माेटारीतून पाठलाग करणाऱ्या पाच-सहा एजंटांवरच धावून गेले. पोलिसात तक्रार करण्यासाठी फोनाफोनी सुरू केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून एजंटांनी पंपावरून मोटारीसह पळ काढला.

दिघंची परिसरात एजंटांचे ठाणदिघंची-पंढरपूर व दिघंची-आटपाडी महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांनी ठाण मांडले आहे. हफ्ते थकवलेल्या वाहनांना महामार्गावरच अडवले जाते. काही वेळा संबंधित वाहनाचा धोकादायक पद्धतीने पाठलाग केला जातो. यामुळे महामार्गावरील वाहतूक असुरक्षित बनली आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात