शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 17:38 IST

Politics Gopichand Padalkar Sangli :विधानपरिषदेचे आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर व निलेश नेताजी पाटील (रा. खंबाळे-भा.) अशा चार जणांविरूध्द विटा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला. नायब तहसीलदार चेतन कोनकर यांनी याबाबतची फिर्याद पोलीसांत दिली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन बाणूरगडावर स्मारकाचे भूमीपूजन

विटा (सांगली) : जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून बाणूरगड (ता.खानापूर) येथे बहिर्जी नाईक स्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रमावेळी जास्त लोकांची उपस्थिती करीत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे प्रवक्ते व विधानपरिषदेचे आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर व निलेश नेताजी पाटील (रा. खंबाळे-भा.) अशा चार जणांविरूध्द विटा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला. नायब तहसीलदार चेतन कोनकर यांनी याबाबतची फिर्याद पोलीसांत दिली आहे.बाणूरगड येथे दि. १९ जुलै रोजी सायंकाळी पर्यटन विकास अंतर्गत बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा परिसर विकास व पर्यटन पायाभूत विकास कामाचे भूमीपूजन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आॅनलाईन झाले. त्या कार्यक्रमाचे ठिकाणी माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांच्यासह सुमारे १५० ते १७० जण उपस्थित होते.या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या बंदी आदेशाचे उल्लघंन झाले होते. त्यामुळे भारतीय साथरोग अधिनियम १८९७ कलम ११, आपत्ती व्यवस्थान अधिनियम २००५ चे कलम ५१ अ प्रमाणे भाजपचे आ. गोपीचंद पडळकर, त्यांचे बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर (दोघेही रा. पडळकरवाडी, ता.आटपाडी), सरपंच सज्जन बाबर (रा. बाणूरगड) व ठेकेदार निलेश पाटील (रा. खंबाळे-भा.) अशा चार जणांविरूध्द नायब तहसीलदार चेतन कोनकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विटा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :PoliticsराजकारणGopichand Padalkarगोपीचंद पडळकरCrime Newsगुन्हेगारीSangliसांगली