रुपाली चाकणकर यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : अनिता पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST2021-09-12T04:30:30+5:302021-09-12T04:30:30+5:30

आटपाडी : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे प्रसिध्द करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ...

File charges against those who made offensive remarks against Rupali Chakankar: Anita Patil | रुपाली चाकणकर यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : अनिता पाटील

रुपाली चाकणकर यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : अनिता पाटील

आटपाडी : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे प्रसिध्द करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा अनिता पाटील यांनी आटपाडीचे पोलीस निरीक्षक भानुदास निभोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाटील म्हणाल्या की, महिलांवर होणाऱ्या आक्षेपार्ह टिपण्णी खेदजनक आहेत. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या गुरुवारी आटपाडीतील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी उपस्थित होत्या. या दरम्यान त्यांच्याबाबत आक्षेपार्ह पाेस्ट समाजमाध्यमांमध्ये प्रसिध्द झाली. संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा या प्रश्नी तीव्र आंदाेलन करणार आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, सौरभ पाटील, वैशाली सावंत, अश्विनी कासार, अपर्णा भिंगे उपस्थित होते.

Web Title: File charges against those who made offensive remarks against Rupali Chakankar: Anita Patil