बस्तवडे स्फोटाला जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST2021-02-09T04:29:53+5:302021-02-09T04:29:53+5:30
बस्तवडे येथील गट नं. ३७७ मधील विजयसिंहराजे पटवर्धन यांचा डोंगर यूएसके ॲग्रोचे संभाजी चव्हाण व अन्य तिघांनी विकत घेतला ...

बस्तवडे स्फोटाला जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
बस्तवडे येथील गट नं. ३७७ मधील विजयसिंहराजे पटवर्धन यांचा डोंगर यूएसके ॲग्रोचे संभाजी चव्हाण व अन्य तिघांनी विकत घेतला आहे. काही महिन्यांपासून या डोंगराचे सपाटीकरण करून जमीन तयार करण्याचे काम सुरू होते. शिवशक्ती कन्स्ट्रक्शनने या डोंगराला सुरुंग लावण्याचे काम सुरू केले होते. शेकडो फूट उंचीचा डोंगर सुरुंग लावून उद्ध्वस्त केला गेला. डोंगर फोडून याठिकाणी सपाटीकरणासाठी ब्रेकर, जेसीबी, डंपर, बोअर ब्लास्टिंगच्या मशीनचा वापर करण्यात आला. ही वाहने अद्याप जप्त करण्यात आलेली नाहीत. ही वाहने जप्त करून त्यांच्यावर योग्य तो दंड आकारून गुन्हे नोंद करण्यात यावेत, अशी मागणी भंडारे यांनी केली.
स्फोटानंतर शेजारी उभा असणाऱ्या दुसऱ्याही गाडीचा स्फोट झाला. या स्फोटात प्रतीक स्वामी व ईश्वर बामणे या दोघांचा बळी गेला, तर महेश दुडणावार हा जखमी झाला. एवढा भीषण स्फोट होऊन दोन महिने उलटून गेले तरी अद्याप हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांना करता आला नाही.
याप्रकरणी जमिनीचे मालक यूएसके ऍग्रोचे संभाजी चव्हाण, शिवशक्ती कन्स्ट्रक्शनचे जंगम यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा,अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रवीण धेंडे, दीपक साठे, प्रवीण मोरे आदी उपस्थित होते.
फाेटाे : ०८ तासगाव २