तासगाव रुग्णालयाचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:29+5:302021-04-27T04:28:29+5:30

कस्तुरबा रुग्णालयाचे गेली दोन वर्षे काम चालू आहे. काम पूर्ण करण्याची मुदत ही ३१ मार्च २०२१ रोजी संपली आहे; ...

File a case against the contractor who did not complete the work of Tasgaon Hospital on time | तासगाव रुग्णालयाचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा

तासगाव रुग्णालयाचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा

कस्तुरबा रुग्णालयाचे गेली दोन वर्षे काम चालू आहे. काम पूर्ण करण्याची मुदत ही ३१ मार्च २०२१ रोजी संपली आहे; मात्र ठेकेदार कामात कुचराई करत असून, त्याबाबत बांधकाम विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. संबंधित हॉस्पिटल वेळेत चालू न झाल्यामुळे व सध्या चालू असलेल्या कोविडच्या रोगामुळे रुग्णाचे हाल होत आहेत. सध्या ग्रामीण रुग्णालय तासगाव येथे कोविड रुग्णालय चालू केल्यामुळे महिलांना प्रसूतीकरिता अडचणी निर्माण होत आहेत. गोरगरीब रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे परवळत नाही. त्याबाबत गाभिर्याने विचार करून तत्काळ संबंधित ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घ्यावे, अन्यथा संबंधित ठेकेदार यांना

काळ्या यादीत टाकावे आणि ठेकेदाराचे बिल देण्यात येऊ नये, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.

चौकट:

सध्या कोविड साथीचा प्रादुर्भाव पाहता कस्तुरबा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करावे. तसे झाल्यास या ठिकाणी कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Web Title: File a case against the contractor who did not complete the work of Tasgaon Hospital on time