शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'चित्रा रामकृष्ण, आनंद सुब्रमण्यमवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 19:14 IST

शेअर बाजारासारख्या अत्यंत महत्वाच्या संस्थेमधील सर्वोच्च व्यक्तीने अध्यात्मिक गुरूच्या सल्ल्याने कामकाज करणे ही शरमेची बाब

सांगली : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी अध्यक्ष चित्रा रामकृष्ण आणि त्यांचे सहकारी आनंद सुब्रमण्यम यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. चित्रा यांनी सेबीला दिलेला जबाब गृहीत धरून दोघांना तातडीने अटक करण्याची मागणीही केली आहे.तसे निवेदन अंनिसने सीबीआय व मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शेअर बाजारासारख्या अत्यंत महत्वाच्या संस्थेमधील सर्वोच्च व्यक्तीने अध्यात्मिक गुरूच्या सल्ल्याने कामकाज करणे ही शरमेची बाब आहे. गुन्हादेखील आहे. को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी चित्रा यांनी तसा जबाबही दिला आहे. आनंद सुब्रम्हण्यम यांची नियुक्ती आणि इतर बाबींमध्ये हिमालयातील अध्यात्मिक गुरूचा सल्ला घेत असल्याचे नमूद केले आहे. गुरूचा ठावठिकाणा विचारला असता त्यांना मानवी देह नाही असे अतिंद्रीय शक्तींचा दावा करणारे उत्तर दिले आहे.प्रत्यक्षात शरीराशिवाय मानवी अस्तित्व शक्य नाही, या स्थितीत लोकांच्या मनातील धार्मिक भावनांचा गैरफायदा घेऊन दोघांनी लोकांची फसवणूक केली आहे. तथाकथित बाबाकडून आलेल्या इमेलदेखील सीबीआयच्या चौकशीत सापडल्या आहेत. सेबीने केवळ आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेचा तपास करताना भोंदूगिरीच्या दाव्यांकडे दुर्लक्ष केले आहे, पण भोंदुगिरीचाही तपास करायला हवा.पत्रकात म्हटले आहे की, अत्यंत महत्वाच्या पदावरील व्यक्तीने महत्वाचे कार्यालयीन निर्णय भोंदू बाबाच्या सल्ल्याने घेणे ही फसवणूक आहे. लोकांच्या धर्मभावनांचा फायदा उठविण्यासाठी एखाद्या बाबाच्या नावाआड कृष्णकृत्य झाकण्याचा प्रयत्न करणे हीदेखील जनतेची फसवणूक आहे. हे लोकांसमोर येण्यासाठी अंनिस पाठपुरावा करणार आहे. सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा याविषयी प्रबोधन मोहीम राबवणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीshare marketशेअर बाजार