इस्लामपूरमध्ये मारामारी

By Admin | Updated: April 1, 2016 01:31 IST2016-04-01T01:12:01+5:302016-04-01T01:31:46+5:30

दोघांना पोलिस कोठडी

Fights in Islampur | इस्लामपूरमध्ये मारामारी

इस्लामपूरमध्ये मारामारी

इस्लामपूर : उरुण परिसरातील वळसे वाड्यातील मारहाणप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक करुन येथील न्यायालयासमोर उभे केले असता, तिघांची जामिनावर मुक्तता झाली. तसेच दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.
इस्लामपूर शहरातील उरूण परिसरात वळसे वाड्यातील चौघांना दि. २४ मार्च रोजी रात्री १० वाजता मारहाण झाली होती. यावेळी भांडण सोडवण्यास गेलेल्या महिलांनाही मारहाण झाली. मोहन वळसे यांनी पाच संशयितांविरोधात फिर्याद दिली होती. याप्रकरणी कपिल कृष्णा पवार (वय २१), सूरज अशोक जाधव (२१, दोघे रा. पवार गल्ली), संतोष भीमराव कोळेकर (२१), सचिन बाबूराव कोळेकर (३०), शंकर बाळासाहेब श्रीराम (सर्व रा. अहिल्यानगर) यांना अटक केली होती.
गुरुवारी या सर्वांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने कपिल कृष्णा पवार , सूरज अशोक जाधव, सचिन बाबूराव कोळेकर यांची जामिनावर मुक्तता केली. तसेच उर्वरित संतोष कोळेकर आणि शंकर श्रीराम यांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिस या मारामारी प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Fights in Islampur