तोंडोलीत शेड बांधण्याच्या कारणावरून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST2021-07-25T04:23:14+5:302021-07-25T04:23:14+5:30

या घटनेत प्रकाश चंदर मोहिते (वय ४७), रोहित प्रकाश मोहिते व सुनील चंदर मोहिते, ऋतिक सुनील मोहिते व प्रतीक ...

Fighting over the reason for building a shed in the mouth | तोंडोलीत शेड बांधण्याच्या कारणावरून हाणामारी

तोंडोलीत शेड बांधण्याच्या कारणावरून हाणामारी

या घटनेत प्रकाश चंदर मोहिते (वय ४७), रोहित प्रकाश मोहिते व सुनील चंदर मोहिते, ऋतिक सुनील मोहिते व प्रतीक सुनील मोहिते असे पाच जण जखमी झाले आहेत. प्रकाश मोहिते व सुनील मोहिते या सावत्र भावांनी एकमेकांविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन्ही बाजूकडील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी प्रकाश मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुनील चंदर मोहिते, प्रतीक सुनील मोहिते, ऋतिक सुनील मोहिते, विद्या सुनील मोहिते यांच्या विरोधात, तर सुनील मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रकाश चंदर मोहिते, रोहित प्रकाश मोहिते, सविता प्रकाश मोहिते व अमिता मारुती मोहिते (सर्व रा. तोंदोली, ता. कडेगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Fighting over the reason for building a shed in the mouth