जतमध्ये किरकाेळ वादातून दाेन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:49 IST2021-02-21T04:49:48+5:302021-02-21T04:49:48+5:30
जत : रस्त्याने चालत जात असताना धक्का लागल्याच्या व रागाने बघितल्याच्या कारणावरून जत शहरातील दोन गटांत काठी व ...

जतमध्ये किरकाेळ वादातून दाेन गटांत हाणामारी
जत : रस्त्याने चालत जात असताना धक्का लागल्याच्या व रागाने बघितल्याच्या कारणावरून जत शहरातील दोन गटांत काठी व दगडाने मारामारी झाली. ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान शिवाजी चौक येथे घडली. याप्रकरणी दाेन्ही गटांतील बारा जणांच्या विरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही.
याबाबत अभिषेक बाळू कांबळे (१८, रा. विठ्ठलनगर जत) याने रोहन नामदेव काळे, राहुल काळे, नामदेव काळे, सज्जन मुल्ला, अविनाश जाधव, सुरेश उर्फ बिऱ्या साठे सर्व (रा. जत) या सात जणांच्या विरोधात जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. शिवाजी चौकात कार्यक्रम पाहण्यासाठी मित्रांसोबत गेलो असताना किरकोळ कारणावरून वरील सात जणांनी मला शिवीगाळ देऊन व दगडाने मारहाण करून जखमी केले आहे, अशी फिर्याद अभिषेक कांबळे याने दिली आहे.
दुसरी फिर्याद रोहन नामदेव काळे (रा. उमराणीरोड, जत) याने अभिषेक कांबळे, पंकज मोरे, पप्पू जाधव, साजिद पखाली, सौरभ (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर दोन ते तीन अनोळखींविराेधात दाखल केली आहे. आत्याचा मुलगा धनंजय चव्हाण व मी शिवजयंती उत्सव पाहण्यासाठी गेलाे असताना धनंजय चव्हाण यास दगड व काठीने मारहाण करून वरील संशयित घेऊन चालले हाेते. त्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असताना मला दगड व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस करत आहेत.