मिरजेत दोन गटांत हाणामारी; सहाजणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:20 IST2020-12-27T04:20:40+5:302020-12-27T04:20:40+5:30

कल्पना मधुकर मस्के यांनी मेघा कृष्णा हुलवान, कमल बबन वावरे आणि मेघाची बहीण अशा तिघांविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याची ...

Fighting between two groups in Miraj; Crime against six | मिरजेत दोन गटांत हाणामारी; सहाजणांविरुद्ध गुन्हा

मिरजेत दोन गटांत हाणामारी; सहाजणांविरुद्ध गुन्हा

कल्पना मधुकर मस्के यांनी मेघा कृष्णा हुलवान, कमल बबन वावरे आणि मेघाची बहीण अशा तिघांविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार केली आहे. कमल बबन वावरे यांनी कल्पना मस्के, मयूर मस्के, गीता मस्के, माधवी मस्के, अनुसया मस्के यांच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार दिली आहे. कमल वावरे यांच्या घरातील लहान मुलांनी त्यांच्या अंगणातील टोमॅटो तोडले. यावेळी लहान मुलांना त्या समजावून सांगत असताना तिघांनी जातिवाचक शिवीगाळ केली. मुलगी माधवी हिला केस ओढत मारहाण केल्य‍ाची तक्रार कल्पना मस्के यांनी दिली आहे. लहान मुलांनी मस्के यांच्या अंगणातील टोमॅटोचे झाड तोडल्याने शिवीगाळ, दमदाटी करून लहान मुलांना मारण्यास आल्याबद्दल विचारणा केल्याने कल्पना यांनी मारहाण केली. भांडणे सोडविण्यासाठी मुलगी मेघा आली असता तिचेही केस उपटून मारहाण केल्याचे कमल वावरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रार देण्यात आली असून, मिरज शहर पोलीस ठाण्यांत दोन्ही गटांच्या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Fighting between two groups in Miraj; Crime against six